सहकारी महिला डॉक्टरकडे भलतीच मागणी; नकार देताच महिनाभर मनोरुग्ण म्हणून ठेवले
राजकुमार गवळे यांनी शरीरसुखाची मागणी केली. त्याला विरोध केला. त्यामुळे गवळे यांनी मला मानसिक रुग्ण आहे म्हणून एक महिना भरती केले.
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यसनमुक्ती केंद्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टरकडे शरीर सुखाची मागणी करून तिला मनोरुग्ण ठरवण्यात आले. त्यांनतर वेशव्यवसाय करण्यास सांगण्यात आलं. यावरून अंबाजोगाईतील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील, संचालक राजकुमार सोपान गवळे आणि ओम डोलारे या तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित महिला डॉक्टर डॉ. संध्या वाघमारे म्हणाल्या, अन्यायाची दाद मागण्यासाठी आली आहे. २२ फेब्रुवारील २०२२ रोजी ऑफिसर म्हणून जॉईन झाले. नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील आहेत. संचालक राजकुमार सोपान गवळे आहेत. सुरुवातीला खूप काम करवून घेतले. सॅलरीची मागणी केली तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर राजकुमार गवळे यांनी शरीरसुखाची मागणी केली. त्याला विरोध केला. त्यामुळे गवळे यांनी मला मानसिक रुग्ण आहे म्हणून एक महिना भरती केले.
अंजली पाटील समाजाला लागलेली कीड
माझ्यावर चुकीचे औषधोपचार केले. त्याचे दुष्परिणाम माझ्या त्वचेवर झालेत, असा खळबळजनक आरोप संध्या वाघमारे यांनी केला. गवळे यांनी एक्सपायर झालेल्या गोळ्या दिल्या. त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्वचेवर रिअॅक्शन झाली आहे. माझे हात पकडून गोळ्या जबरदस्तीने तोंडात टाकल्या. व्यसनमुक्ती केंद्रात येणाऱ्या महिलांना शरीरसुखाची मागणी केली जाते. विरोध केल्यास त्रास दिला जातो. आणखी काही मुली असं बोलू शकतात. अंजली पाटील यांना याबाबत सांगितलं. त्या म्हणाल्या, बघुया काय करता येईल. पण, त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अंजली पाटील ही समाजाला लागलेली कीड आहे, अशी टीका संध्या वाघमारे यांनी केली.
रुग्णाला पुरवली जाते दारू, तंबाखू
अंजली पाटील या व्यसनमुक्ती केंद्र चालवत नाही. तर तो एक कुंटणखाना आहे. रुग्णांना जबरदस्ती अॅडमीट केलं जातं. त्यांना कोंडून ठेवलं जातं. वर्षोनुवर्षे त्यांना अॅडमीट केलं जातं. शासनाकडून पैसे उकळले जातात. रुग्णांना दारू, तंबाखू पुरवली जाते. बायकोची आठवण येऊ नये म्हणून मुली पुरवल्या जातात, असा गंभीर आरोप संध्या वाघमारे यांनी केला.