मस्सजोगमध्ये अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल्या, धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी बडी मंडळी
Santosh Deshmukh : आंदोलनात सहभागी होणार आहोत. हा परिवार एकटा नाही. त्यांच्या दुःखात, वेदनेत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. त्यांनी खचून जाऊ नये. संतोष देशमुख हा माझ्या कुटुंबातील एक घटक होता, शांतीवन मध्ये काम करतांना आम्ही सोबत होतो.

Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना शिक्षा होत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी 25 फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आंदोलनात सहभागी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मस्साजोगमध्ये हालचाली वाढल्या आहेत. राज्यातील बडी मंडळी धनंजय देशमुख यांच्या भेटीला आली आहे. भागचंद महाराज झांजे, शांतीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली.
अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातून भागचंद महाराज झांजे धनंजय देशमुख यांच्या भेटीला आले. त्या दोघांमध्ये चर्चा झाली. यापूर्वी धनंजय मुंडे व महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर झांजे महाराज यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियेनंतर भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याची धमकी आली होती.
भागचंद महाराज झांजे काय म्हणाले?
भागचंद महाराज झांजे म्हणाले, संतोष भैय्या यांना जाऊन 77 दिवस झाले आहेत. अजून आरोपी सापडला नाही. प्रशासन हलगर्जीपणा करताय की काय? असा प्रश्न आहे. महंत नामदेव शास्त्री यांच्या विषयी मी एक बाईट दिली होती त्यानंतर मला धमक्या आल्या होत्या. या परिवार एवढे मोठे संकट ओढवलs आहे, त्यांना उपोषण करण्याची वेळ येते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. घरातील एक व्यक्ती जाऊन त्यांना न्याय भेटत नाही ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. गावकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत म्हणून मी आलो आहे, महाराष्ट्र कुठे जात आहे. स्वतःला महंत म्हणून घेणारे जर एखाद्या नेत्याच्या पाठीशी असतील, अप्रत्यक्षरीत्या आरोपीची पाठाखण करत असतील तर आम्ही जाहीरपणे देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहणार आहोत.




आंदोलनात सहभागी होणार
भागचंद महाराज झांजे म्हणाले, उद्या आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहोत. हा परिवार एकटा नाही. त्यांच्या दुःखात, वेदनेत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. त्यांनी खचून जाऊ नये. संतोष देशमुख हा माझ्या कुटुंबातील एक घटक होता, शांतीवन मध्ये काम करतांना आम्ही सोबत होतो.
शांतीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे धनंजय देशमुख हे सुद्ध धनंजय देशमुख यांच्या भेटीला आले आहे. धनंजय देशमुख व दीपक नागरगोजे यांच्यात चर्चा झाली.
दीपक नागरगोजे काय म्हणाले…
शांतीवनचे संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे म्हणाले, संतोष माझ्या कुटुंबियांचा सदस्य होता. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे. संतोष देशमुख हा एक मोठा सामाजिक कार्यकर्ता होता. दुर्दैवाने त्याच्या सामाजिक कार्याची बाजू अजूनही महाराष्ट्राच्या समोर आली नाही. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणे ही जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना धडपड करावी लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये न्यायासाठी लढा द्यावा लागतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. न्याय हा नैसर्गिकरित्या मिळायला हवा होता, तो मिळाला ही पाहिजे होता पण अजून न्यायाच्या प्रक्रियेत कमतरता वाटते, असे नागरगोजे यांनी म्हटले.