Pune Water : प्रश्न पाण्याचा अन् पायाभरणी महापालिका निवडणुकीची, पाणीटंचाईवर चंद्रकांत पाटलांची भन्नाट आयडिया..!
पुणे शहराला मागणीपेक्षा अधिकाचा पाणीपुरवठा होऊन देखील टंचाई भासत आहे. त्यामुळे प्रश्न हा पाणीसाठ्याचा नसून पाण्याच्या प्रवाहाचा असल्याचे पाटलांनी सांगितले आहे. पाण्याचे योग्य नियोजन या अनुशंगाने त्यांनी पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे निधी नसला तरी लोकवर्गणीतून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पुणे : नाही म्हणलं तरी आता (Municipal Election) महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागलेच आहे.त्यामुळे लोकप्रतिनीधींकडून (Infrastructure) पायाभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे शहरातील पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील यांनी तर बैठकच बोलावली. शिवाय पाण्याची समस्या निर्माण होण्याची कारणे आणि त्यावर काय आहे उपाययोजना याचा पाढाच त्यांनी उपस्थितांना वाचून दाखवला आहे. राज्याचे राजकारण ढवळून निघत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याच अनुशंगाने पुणेकरांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी लोकवर्गणी करु असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना दिले आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांची जाण आणि भविष्यात त्याचा फायदाही पक्षाला होईल हेच धोरण भाजपा नेत्यांचे राहिले आहे.
अशी होणार पाणीटंचाईवर मात
पुणे शहराला मागणीपेक्षा अधिकाचा पाणीपुरवठा होऊन देखील टंचाई भासत आहे. त्यामुळे प्रश्न हा पाणीसाठ्याचा नसून पाण्याच्या प्रवाहाचा असल्याचे पाटलांनी सांगितले आहे. पाण्याचे योग्य नियोजन या अनुशंगाने त्यांनी पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे निधी नसला तरी लोकवर्गणीतून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाण्यासाठी निधी वर्ग करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. शिवाय पालिकेकडे टॅंकरची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे प्रशासनाकडे पैस नसतील तर लोकांकडून मदत उभा करु फक्त तूम्ही परवानगी द्या लोक वर्गणीतून सगळे काम करु असेही आश्वासन त्यांनी दिले आहे.
लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याचा प्रश्न
दिवसेंदिवस शहाराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा ताण प्रशासनावर पडत आहे. आतापर्यंत वेळप्रसंगी टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पण वाढत्या लोकसंख्येमुळे टॅंकरचीही संख्या कमी पडत आहे. लोकसहभागातून पाण्यासंबंधीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी सर्वसामान्यांची साथ असणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत पाटलांनी बैठकीत सांगितले आहे.
मुलभूत प्रश्नांवर लोकप्रतिनिधींचे लक्ष
महापालिकेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्नच महत्वाचे असतात. त्याचनुसार भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी पाण्याच्या प्रश्नावरुन नाराजी नको म्हणून पाण्यासाठी कायपण करण्याची तयारी दर्शवली आहे. यामधून पुणेकरांचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी राजकीय पोळी भाजून घेण्याची एकही संधी आता राजकीय नेते सोडणार नाही हे मात्र नक्की.