तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. भंडाऱ्यात एक-दोन नव्हे तर 3,648 तलाव आहेत. या जिल्ह्यात सुगंधी तांदळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतलं जातं. त्यामुळे सुगंधी तांदळाचा जिल्हा म्हणूनही भंडाऱ्याची ओळख आहे. तसेच या जिल्ह्यात तांबे या धातुचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या जिल्ह्याला ‘ब्रास सिटी’ म्हणूनही संबोधले जाते. ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमुळेही या जिल्ह्याला वेगळं महत्त्व आहे. भंडाऱ्याचे क्षेत्रफळ 3,716 वर्ग कि.मी. आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या 12,00,334 एवढी आहे. भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्हा पूर्वेकडे गोंदिया, दक्षिणेला चंद्रपूर आणि पश्चिमेला नागपूर जिल्हा आहे. भंडाऱ्यात भंडारा, साकोली, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर असे सात तालुके येतात. श्री भृशुंड गणेश मंदीर, उमरेड कहरंदला अभयारण्य, पवनराजे किल्ला, अंबागड किल्ला, कोरंभी देवी मंदीर आणि इंदिरा सागर प्रकल्प ही इथली प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. भंडारा-गोंदिया मतदारसंघामध्ये भंडारा जिल्ह्यामधील 5 व गोंदिया जिल्ह्यामधील 1 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. हा मतदारसंघ 2008 साली निर्माण करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.
भंडारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा