Bhandara Crime | साकोलीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले, बसमधून 25 लाखांचे दागिने गायब, कपाटातील 2 लाख चोरट्यांनी उडविले
सोन्याची बिस्किटे असेलेली बॅग एसटीतून लंपास झाली. ही साकोली बसस्थानकावर घडली. यात 25 लाख 93 हजार रुपये किमतीचे 471 ग्रॅम सोन्याचे दागिने व 4 लाखाची 82 ग्रॅम सोन्याची बिस्किटे असेलेली बॅग एसटीतून लंपास झाली. तीन चोरट्यांनी बॅग लंपास केल्याचा संशय आहे.
भंडारा : सेंदुरवाफा (Sendurwafa) येथील श्रीनगर कॉलनीत रहिवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी महादेव राउत (वय 75 वर्षे) हे आपल्या पत्नीसोबत राहतात. हवा पालट व्हावी म्हणून मुंबईला गेले होते. टूर जास्त दिवसाचा असल्याने झाडांना पाणी देता यावे म्हणून चाबी शेजारील व्यक्तीकडे दिली. चोरीच्या घटनेच्या दिवशी शेजारी झाडांना पाणी देण्यासाठी आले. त्यांना घरातील लाइट सुरू दिसले. दरवाज्याचा कुलूप तुटलेला दिसला. याची माहिती त्यांनी मुंबई येथे गेलेल्या घरमालक महादेव राउत (Mahadev Raut) यांना दिली. त्यांनी आपले घर गाठले. कपाटातील 1 लाख 90 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. याची साकोली पोलिसांना (Sakoli Police) तक्रार दिली. आता साकोली पोलीस त्या चोरांचा मागावर आहेत.
सोन्याची बिस्कीटं उडविली
राजेंद्रसिंग जसवंतसिंग राठोड वय 24 वर्ष (रा. नागाने, राजस्थान) असे दिवाणजीचे नाव आहे. ते पुणे येथील भवरलाल त्रिलोकचंद अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्ममध्ये कार्यरत आहेत. 30 मे रोजी जवळपास 30 ते 35 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व बिस्किटे घेऊन ते निघाले. सोन्याची बिस्किटे असेलेली बॅग एसटीतून लंपास झाली. ही साकोली बसस्थानकावर घडली. यात 25 लाख 93 हजार रुपये किमतीचे 471 ग्रॅम सोन्याचे दागिने व 4 लाखाची 82 ग्रॅम सोन्याची बिस्किटे असेलेली बॅग एसटीतून लंपास झाली. तीन चोरट्यांनी बॅग लंपास केल्याचा संशय आहे. याप्रकरणी साकोली ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.
सीटवरील बॅग गायब झाली कशी?
गोंदिया येथील सराफांना दागिने देऊन गोंदियावरून तो भंडारा येथे जाण्यासाठी सायंकाळी बसमध्ये बसले. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास बस साकोली बसस्थानकावर आली. तहान लागल्याने बॅग बसमध्येच ठेवून पाण्याची बाटली घेण्यासाठी दिवानजी खाली उतरले. बसमध्ये आल्यानंतर पाहतो तर सीटवरील बॅग गायब झाली. खाली उतरुन त्यांनी तत्काळ आपल्या मालकाला फोन केला. साकोली ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून उशिरा रात्री गुन्हा नोंदविला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या चमू रवाना करण्यात आले.