विदर्भातील तुमसर बाजार समिती निवडणुकीला स्थगिती, निवडणूक लांबणीवर, नागपुर खंड पीठाचा निर्णय

Tumsar Agricultural Produce Market Committee : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 27 मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. यासाठी 3 एप्रिल अखेरची दिनांक होती.

विदर्भातील तुमसर बाजार समिती निवडणुकीला स्थगिती,  निवडणूक लांबणीवर, नागपुर खंड पीठाचा निर्णय
tumsarImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 12:55 PM

तेजस मोहतुरे, भंडारा : भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी (mohadi) तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Grampanchayat election) झाल्या नाहीत, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरपंच व सदस्यांना प्रतिनिधित्व नसल्याच्या मुद्यावरून विदर्भातील श्रीमंत बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर बाजार समिती निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर काल सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तुमसर बाजार समितिची पूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता तुमसर बाजार समितीची निवडणूक लांबणीवर गेली आहे. हरदोली येथील माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या प्रयत्नाला आता यश आले आहे.

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 27 मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. यासाठी 3 एप्रिल अखेरची दिनांक होती. काल याचिकेवर सुनावणी झाली असता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुमसर आणि मोहाडी या तहसीलमधील मतदारांचा समावेश आहे. सद्या 17 नोव्हेंबर 2022 पासून नियुक्त असलेले प्रशासकच बाजार समितीचा कारभार पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

1963 च्या अधिनियमाच्या कलम 13 (1) च्या तरतुदींनुसार बाजार समितीने इतर सदस्यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी निवडलेले चार सदस्य असणे आवश्यक आहे. तुमसर आणि मोहाडी तालुक्याचा समावेश असलेल्या बाजार परिसरात अनुक्रमे 97 आणि 74 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 75 पैकी 58 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबर 2012 रोजी स्थगिती दिली आहे. आजपर्यंत या निवडणुका झालेल्या नाहीत, मोहाडी तहसीलमधील पन्नास टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतींना बाजार समितीत प्रतिनिधित्व मिळण्यापासून वंचित राहावे लागणार होते. हा मुद्दा उपस्थित करुन याचिकाकर्ते माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे रिट याचिका दाखल केली होती. दरम्यान तुमसर बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली गेली असल्याचं सदाशिव ढेंगे, माजी सरपंच (याचिकाकर्ता) यांनी सांगितले.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....