Bhandara : कोट्यावधी रुपयांच्या धान्य घोट्याळ्यानंतर संपुर्ण जिल्हा हादरला, 13 जणांवर गुन्हा दाखल
भंडारा जिल्ह्याच्या नाकाडोंगरी येथील धान खरेदी केंद्रात सुमारे चार कोटींचा अपहार झाल्याचं उजेडात येताचं, तुमसर तालुक्यातील आंबागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन कोटी 71 लाख 34 हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली.
भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या धान्य खरेदी केंद्रात मोठा घोटाळा होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासन (administration) हादरले आहे. झालेल्या चौकशीत कोट्यावधी रुपयांच्या धान्याचा अपहार झाला आहे. भंडारा जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंधरा जणांनी घोटाळा केला असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी (bhandara police) तात्काळ ताब्यात घेतलं आहे. अरविंद भगवान दास भुतांगे आणि स्वप्निल राजेश शामकुवर दोन्ही रा. आंबागड अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. उरलेल्या तेरा जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
71 लाख 34 हजार रुपयांचा अपहार
भंडारा जिल्ह्याच्या नाकाडोंगरी येथील धान खरेदी केंद्रात सुमारे चार कोटींचा अपहार झाल्याचं उजेडात येताचं, तुमसर तालुक्यातील आंबागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन कोटी 71 लाख 34 हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली. भंडारा जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये एकूण 15 जणांचा समावेश असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अरविंद भगवान दास भुतांगे व स्वप्निल राजेश शामकुवर दोन्ही रा. आंबागड अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या लोकांची नावं
या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये राधेशाम तोलाजी रहांगडाले (अध्यक्ष), संचालक म्हणून गोपीचंद कवळु बावनकर, सुधीर चंदुलाल ठाकरे, संजय फत्तु कावळे, निलकंठ रतिराम मोरे, घनशाम झागडुसाव जांभुळपाने, राजेश सुखराम शामकुवर, नंदलाल डोमाजी रहांगडाले, बुधराज पंढरी पटले, श्रीपत अंतु कोकोडे, गणेश उदेसिंग पंचरे, भगवान भुतांगे, सचिव अनिल तोलाजी रहांगडाले तर ग्रेडर अरविंद भगवानदास भुतांगे व स्वप्नील राजेश शामकुवर यांचा समावेश आहे.
कशी केली फसवणूक
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंबागड, ता. तुमसर या नावाने असलेल्या संस्थेमध्ये असलेल्या 15 जणांनी संगनमत करून आंबागड येथे धान खरेदी केंद्र असलेल्या धान खरेदी हंगाम सन 2021-2022 मध्ये खरीप हंगामाचे प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तऐवज तयार केले. यातून शासनाची व मार्केटिंग फेडरेशन व शेतकऱ्याची दोन कोटी 71 लाख 34 हजार 438 रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे. जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर यात पोलिसांनी 15 जणांविरुद्ध भादंविच्या 406, 409, 420, 467, 468, 472, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.