Bhandara Cyclist : भंडाऱ्यातील सायकलपटू सुशिकला आगाशे दिल्लीतील साईत, राष्ट्रकुलनंतर लक्ष्य राष्ट्रीय स्पर्धेचं

नीलज खुर्द हे गाव मोहाडी तालुक्यात येते. छोट्याशा गावातून सुशिकलानं स्वतःला सिद्ध केलं. जिद्द आहे. त्यामुळं ती पुढं जाईल. निश्चित धेय्य साध्य करेल, यात शंका नाही.

Bhandara Cyclist : भंडाऱ्यातील सायकलपटू सुशिकला आगाशे दिल्लीतील साईत, राष्ट्रकुलनंतर लक्ष्य राष्ट्रीय स्पर्धेचं
भंडाऱ्यातील सायकलपटू सुशिकला आगाशे दिल्लीतील साईत
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 4:45 PM

भंडारा : जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द (Nilaj Khurd) येथील सुशिकला आगाशे (Sushikala Agashe). तिचे वडील दुर्गाप्रसाद (Durga Prasad Agashe) हे शेतकरी आहेत. आई नंदा या गृहिणी आहेत. घरी एक एकर शेती. पण, त्यांना पाच मुली आहेत. त्यांनी शिकावी ही आईवडिलांची इच्छा. पाच मुलींपैकी दोघींना खेळाची आवड होती. 2013 ची गोष्ट सुशिकला गावच्या शाळेत शिकत होती. एकेदिवशी शारीरिक चाचणी झाली. सुशिकलाची निवड पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत झाली. तिथं गेल्यानंतर तिला सायकलिंग हा गेम मिळाला. सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. पुरस्कार, मेडल्स मिळाल्यावर तिचा आनंद द्विगुणित होत होता. स्थानिक पातळीवर स्पर्धा गाजविल्यानंतर ती राज्यस्तरीय स्पर्धेत गेली. खेलो इंडियातही सुशिकलानं चमक दाखविली.

दिल्लीतील साई सेंटरमध्ये प्रशिक्षण

सुशिकला ही तुमसर येथील महिला महाविद्यालयात शिकते. आशियाई स्पर्धांसह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तीस पदकं जिंकली. जर्मनी, इटली व इंग्लंडसारख्या युरोपीयन देशांमधील स्पर्धात तिने आपली छाप सोडली. बर्मिंगहॅम (इंग्लंड) मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत तिला पदक जिंकता आले नाही. पण, स्पर्धेतील अनुभव तिच्यासाठी मोठा आहे. सध्या सुशिकला दिल्लीच्या साई सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

आता लक्ष्य दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धा

सुशिकलाची लहान बहीण दिपाली. दीपाली राष्ट्रीय स्तरावरची हॉकीपटू आहे. तिनेसुद्धा विदर्भ व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. देशभरातील अनेक स्पर्धा गाजविल्या. सुशिकला म्हणते, मी सायकलिंगमध्ये आतापर्यंत जे मिळविलं त्यात समाधानी नाही. मला मोठा पल्ला गाठायचा आहे. राष्ट्रकुलनंतर आता माझे लक्ष्य पुढील महिन्यात दिल्ली येथे होणारी राष्ट्रीय स्पर्धा आहे. नीलज खुर्द हे गाव मोहाडी तालुक्यात येते. छोट्याशा गावातून तीनं स्वतःला सिद्ध केलं. जिद्द आहे. त्यामुळं ती पुढं जाईल. निश्चित धेय्य साध्य करेल, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.