कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात! जादूटोण्याच्या संशयावरुन विधवा महिलेचा खून

Bhandara Murder : बबिता तिरपुडे ही महिला कपडे धुण्यासाठी गेली होती. पण 28 एप्रिल रोजी तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता.

कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात! जादूटोण्याच्या संशयावरुन विधवा महिलेचा खून
खळबळजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 10:12 AM

भंडारा : भंडाऱ्यात विधवा महिलेचा खून (Bhandara Murder) करण्यात आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला जादूटोणा करत असल्याच्या संशयातून तिचा खून करण्यात आला. डोक्यावर काठीनं जोरदार प्रहार या महिलेवर (Attack on widow women) करण्यात आला. त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस (Bhandara crime news) स्थानकाअंतर्गत नवेगाव इथं ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटकही केली आहे. ही महिला रक्तबंबाळ अवस्थेत आढलून आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेचा मृतदेह पासून परिसरातील लोक हादरुन गेले होते. ही महिला कपडे धुवायला गेली असताना हे हत्याकांड घडलं. दरम्यान, या महिलेची हत्या करण्यासाठीचं कारणंही हारवून टाकणारं आहे. आरोपींनी हत्येची कबुली देताना या महिलेचा जीव का घेतला, हे देखील सांगितलंय. या संपूर्ण घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी पोलिसांनी केली होती. त्यातून धक्कादायक खुलासा करण्यात आलाय.

का केली हत्या?

संशयतून दोघांनी या महिलेचा जीव घेतलीय. जादूटोणा करत या महिलेनं आपल्या पत्नी मारलं, असं संशय एकानं घेतला होता. त्यातूनच आरोपीनं आपल्या मित्राची मदत घेत या महिलेच्या हत्येच कट रचला. योग्य वेळ पाहून या महिलेच्या डोक्यात काठीनं वार करण्यात आले. त्यानंतर या महिलेचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नवेगाव इथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कुणी केली हत्या?

45 वर्षांच्या बबिता तिरपुडे या महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. राजहंस कुंभरे आणि विनोद रामटेके या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी हत्येची कबुलीही दिली आहे. अटक केलेले दोघेही जण नवेगाव कोका इथं राहणारे होते.

हे सुद्धा वाचा

असा रचला हत्येचा कट

कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव इथं बबिता तिरपुडे ही महिला कपडे धुण्यासाठी गेली होती. पण 28 एप्रिल रोजी तिचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, डोक्यावर काठी मारून आणि गळा दाबून तिचा खून केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. याप्रकरणी कारधा पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली.

आरोपी राजहंस कुंभरे याने मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाल्याच्या संशयातून बबिता हिच्या हत्येचा कट रचला होता. मनात राग धरून बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडे हिचा खून विनोद रामटेके याच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिली. दोन्ही आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास केला जातोय. पोलीस निरीक्ष राजेशकुमार थोरात यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गणपती मंदिराबाहेरुन थेट आढावा : पुणे LIVE

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.