जावयाने धक्का दिल्याने सासऱ्याला कालव्यात बुडून मृत्यू, भावाचा मृतदेह बाहेर काढताना लहान भाऊही बुडाला
Bhandara Drown : मोठ्या भावाचा पाण्यात बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लहान भावाचाही यावेळी कालव्यात बुडून मृत्यू झाला.
भंडारा : भंडारामध्ये (Bhandara two brothers drown) एक विचित्र घटना घडली. जावयानं सासऱ्याला (Father in law murder) कालव्यात धक्का दिला. यात सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मृत्यू झालेल्या सासऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांच्या लहान भावानं धाव घेतली. हा मृतदेह बाहेर काढताना लहान भावाचाही कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी जावयाला (Son in law arrested by Bhandra Police) अटक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून केला जातो आहे. नेमका जावयानं सासऱ्याला धक्का देऊन कालव्यात का पाडलं, याबाबात आता पोलिसांकडून चौकशी केली जातेय. दरम्यान, दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पनवी तालुक्यातील सिंधी येथे हे घटना घडली.
सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
पनवी तालुक्यातील सिंधी येथे राहणारे हरी गोविंदा नागपुरे आणि चंद्रभाग गोविंदा नागपुरे अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघा सख्ख्या भावांची नावं आहेत.हरी हे 65 तर चंद्रभान हे 55 वर्षांचे होते. हरी यांना त्यांच्या जावयानं गोसेच्या उजव्या कालव्यात धक्का दिला. यात कालव्यात बुडून हरी नागपुरे यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर सकाळी लहान भावाला याबाबत कळल्यानंतर त्यानं घटनास्थळी धाव घेतली.
मोठ्या भावाचा पाण्यात बुडालेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लहान भावाचाही यावेळी कालव्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनं गावात एकच शोखकला पसरली होती. यानंतर पोलिसांनी बुडालेल्या दोन्ही सख्ख्या भावांचे मृतदेह बाहेर काढलेत. या संपूर्ण घटनेनं नागपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
आरोपीला अटक
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या जावयाचं नाव अनिल नारायण हटवार असं आहे. 40 वर्षांच्या अनिलने आपल्या सासऱ्यांना कालव्यात धक्का देऊन त्यांना का जीवे मारलं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या पोलिसांकडून आरोपी अनिल हटवार याची कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय.