Raju Karemore: आमदार राजू कारेमोरे यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
कारेमोरे यांच्या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण तापले होते. यानंतर कारेमोरे यांनी माफी मागितली. मात्र पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली.
अनिक आकरे
भंडारा : पोलीस ठाण्यात धिंगाणा करुन शिवीगाळ करणारे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांना जिल्हा सत्र न्यायालाकडून जामिन मंजूर झाला आहे. राजू कारेमोरे यांना आज अटक केली होती. त्यानंतर त्यांना मोहाडी येथील दिवाणी न्यायालयात आमदार यांना हजार करण्यात आले होते. दिवाणी न्यायालयाने कारेमोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर करीत त्यांना 15 जानेवारीपर्यंत एमआरसी कोठडी सुनावली होती. मात्र आमदारांच्या वकिलांनी तात्काळ भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनाकरीता अर्ज केला. यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने कारेमोरे यांना जामीन मंजूर केला आहे.
राजू कारेमोरे यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत धिंगाणा घातला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र सरकारी अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केली.
कारेमोरे यांच्या मित्रांनी आणि पोलिसांनी एकमेकाविरोधात तक्रार दाखल केली
कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र 31 डिसेंबर रोजी रात्री आमदारांच्या घरुन 50 लाख रुपयांची रोकड घेऊन तुमसरकडे जात होते. यावेळी रस्त्यात मोहाडीतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्टँग रुमसाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांनी रस्स्त्यात वळण असतानाही चालकांना इंडिकेटर दिले नाही. यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग केला. त्यानंतर कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांनी पोलिसांवर आरोप लावले. पोलिसांनी आपल्याला मारहाण करीत आपल्याकडील 50 लाखाची रोकड आणि सोनसाखळी घेतल्याची तक्रार कारेमोरे यांच्या मित्रांनी मोहाडी पोलिसात दाखल केली. तर पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत तक्रार दाखल केली.
कारेमोरे यांनी पोलिसांना दमदाटी करीत अश्लील शिवीगाळ केली होती
यानंतर कारेमोरे यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना दमदाटी करीत अश्लील शिवीगाळ केली होती. कारेमोरे यांच्या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण तापले होते. यानंतर कारेमोरे यांनी माफी मागितली. मात्र पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली. कारेमोरे यांनी दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र दिवाणी न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर कारेमोरे यांच्या वकिलाने जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता त्यांना जामिर मंजुर करण्यात आला. (District Sessions Court grants bail to MLA Raju Karemore)
इतर बातम्या
Ahmednagar Crime: भरदिवसा तरूणाच्या निर्घृण हत्येने कोपरगाव हादरलं, आरोपींचा शोध सुरु