Wardha Crime | शेतातील विहिरीतून पाणी काढायला गेली, पाय घसरून विहिरीत पडली; वर्ध्यात युवतीचा मृतदेहच सापडला
वडिलाला तहान लागली असता ते विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले. त्यांना मुलगी विहिरीत पडून असल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांसमक्ष वैष्णवीचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. वैष्णवी ही संजय गांधी विद्यालय परंडा येथे अकरावीमध्ये शिक्षण घेत होती.
वर्धा : समुद्रपूर (Samudrapur) तालुक्यातील किन्हाळा (Kinhala) येथील 17 वर्षीय युवतीचा विहिरीत पडल्यानं मृत्यू झाला. स्वतःच्या शेतात पिण्याचे पाणी काढत असताना तिचा पाय घसरला. ही घटना शुक्रवारी घडलीय. वैष्णवी गजानन डाखोरे (Vaishnavi Gajanan Dakhore) असे मृत युवतीचे नाव आहे. वैष्णवीचे वडील सकाळीच शेतीच्या कामाला निघून गेले होते. वैष्णवी सकाळीच कामे आटोपून शेतात जायला निघाली. शेतातच विहीर असल्यामुळे घरून पाणी नेण्यापेक्षा शेतातल्या विहिरीतून पाणी काढून देऊ, असा विचार करून पाण्याचा गुंड तिने सोबत घेतला. शेतात पोहोचल्यानंतर शेतातल्या विहिरीतून पाणी काढत असताना अनावधाने तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली.
वडिलांना मृतदेहच दिसला
वडिलाला तहान लागली असता ते विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले. त्यांना मुलगी विहिरीत पडून असल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांसमक्ष वैष्णवीचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. वैष्णवी ही संजय गांधी विद्यालय परंडा येथे अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. समुद्रपूर पोलिसांनी घटनेची नोंद केली.
अशी घडली घटना
वैष्णवी अकरावीत शिकत होती. शेतात विहीर असल्यानं तिथून ते पाणी नेत होते. नेहमीप्रमाणे ती शेतातील विहिरीत पाणी काढत होती. अशात तिचा पाय घसरला असावा. तिला पोहता येत नसल्यानं विहिरीत तिचा मृतदेहच सापडला. समुद्रपूर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.
अकरावीत शिकत होती
वैष्णवी ही अकराव्या वर्गात शिकत होती. ती नेहमीप्रमाणे शेतावर गेली. पण, पाय कसा घसरला तिला काही समजलेच नाही. वडिलांना तरुण पोरीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहून गहिवरून आले. शिक्षणाची पोरगी असल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतातील विहिरी या बहुधा खुल्या असतात. विहिरींना तोंडी नसते. त्यामुळं थोडीफार गडबड झाल्यास अशा घटना ग्रामीण भागात घडत असतात.