Bhandara Murder : चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूने वार, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

चोरीच्या बहाण्याने त्याच गावातील आरोपी संजय नगरधने हा किरणापुरे कुटुंबाच्या घरात चोरीच्या बहाण्याने आला. मात्र मौल्यवान साधनाचा शोध घेत असताना चोरट्याच्या हालचालीमुळे मृतक मुरलीधर आणि त्याच्या पत्नीला जाग आली व चोरटा नजरेस पडला.

Bhandara Murder : चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूने वार, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूने वार
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 8:37 PM

भंडारा : दरवाजा उघडा ठेवून झोपणे एका कुटुंबाला चांगलेच भारी पडले आहे. चोरी करायला गेलेल्या चोराचा चोरीचा डाव फसल्यामुळे संतापलेल्या चोरट्याने संबंधित घर मालक पती-पत्नीवर चाकूने वार (Knife Attack) केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कोष्टी गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी पती-पत्नी पैकी पतीचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला असून जखमी (Injured) पत्नीवर भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुरलीधर नत्थू किरणापुरे (40) राहणार कोष्टी असे मयताचे नाव असून सिंधु मुरलीधर किरणापुरे असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून तुमसर पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. (Husband and wife stabbed by thief in bhandara, one death and one seriously injured)

चोरीचा डाव फसल्याने पती-पत्नीवर वार करुन आरोपी पळाला

कोष्टी गावात राहणाऱ्या किरणापुरे कुटुंब आपल्या नित्याचे कामे करून रात्रीच्या सुमारास झोपी गेले होते. त्यांची दोन मूल क्रिकेट बघण्यासाठी गेले असल्याने परत येणार म्हणून त्यांनी दरवाजे उघडे ठेवले होते. दरम्यान चोरीच्या बहाण्याने त्याच गावातील आरोपी संजय नगरधने हा किरणापुरे कुटुंबाच्या घरात चोरीच्या बहाण्याने आला. मात्र मौल्यवान साधनाचा शोध घेत असताना चोरट्याच्या हालचालीमुळे मृतक मुरलीधर आणि त्याच्या पत्नीला जाग आली व चोरटा नजरेस पडला. आता आपला चोरीचा डाव फसला आणि आता आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपीने त्याच्याजवळील असलेला चाकूने दोघांवरही पती-पत्नीवर वार करुन घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला.

अति रक्तस्त्राव झाल्याने जखमी पतीचा मृत्यू

शेजारी असणाऱ्या नागरिकांना किरणापुरे कुटुंबांच्या घरातून आरडाओरडा केल्याचा आवाज आल्याने शेजारी एकत्र येऊन जखमी पती-पत्नींना उपचारासाठी भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मुरलीधर किरणापुरे यांचा जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर पत्नीवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरु केला आहे. दरम्यान तुमसर पोलिसांनी हत्येचा व जबरन चोरीचा गुन्हा नोंद केला असून फरार असलेल्या आरोपी नगरधनेचा तुमसर पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपने किती घातक असते याचे जिवंत उदाहरण भंडारा जिल्हा वासियांना मिळाले आहे. (Husband and wife stabbed by thief in bhandara, one death and one seriously injured)

इतर बातम्या

Kurla Balcony Collapsed : कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune crime| कौटुंबिक वादाला कंटाळल्याने पोलीस कर्मचाऱ्याने उचलले मोठे पाऊल…

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.