Video Bhandara | डॉक्टर की हैवान! चपराशाला अमानुष मारहाण, गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

डॉक्टरने (Doctor) चपराशाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. या डॉक्टरने हातात काठी घेतली. हाताबुक्याने चपराशाला शिविगाळ करून मारहाण केली. याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. या घटनेमुळं डॉक्टरविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

Video Bhandara | डॉक्टर की हैवान! चपराशाला अमानुष मारहाण, गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार
भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथे चपराशाला अमानुष मारहाण करताना डॉक्टर. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 9:49 AM

तेजस मोहतुरे

भंडारा : हा व्हिडीओ (Video) पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल. कारण येथे मारहाण करणारा हा डॉक्टर आहे. आणि ज्याला मारहाण करण्यात आली तो चपराशी आहे. नोकरच नव्हे, तर गुलामासारखी वागणूक देत असल्याचे दिसते. सुरुवातीला या हैवान डॉक्टरने चपराशाल शिवीगाळ ( Doctor insults Chaprashi) केली. त्यानंतर हातात काठी घेतली. येवढ्यावरच त्या डॉक्टरचे समाधान झाले नाही. तर त्याने अक्षरशः लाता बुक्यांनी चपराशाला मारहाण केली. हे ठिकाण भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center at Gobarwahi in Bhandara district) आहे. या आरोग्य केंद्राच्या डॉक्टरकडून ही अमानुष मारहाण करण्यात आली. या डॉक्टरवर काय कारवाई होते ते पाहावे लागेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून डॉक्टरच्या विरोधात आक्रोश उभाळून आलाय.

शिवीगाळ करून गळा आवळला

याला डॉक्टर म्हणावे की शैतान? डॉक्टरांने आपल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रातीलस चपराश्याला गळा आवळून लाथा बुक्यांनी तसेच काठीने अमानुष मारहाण केली. तत्पूर्वी अश्लील शब्दात शिविगाळही केली. भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या डॉक्टरचे नाव डॉ. कडस्कार आहे. मारहाण झालेल्या चपराश्याचे नाव नारायण उइके आहे. मारहाण करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, ज्या प्रकारे डॉक्टर आपल्या कर्मचाऱ्याला मारहाण करत आहे ते भयानक आहे.

पाहा व्हिडीओ कशाप्रकारे मारहाण केली

आदिवासी संघटना आक्रमक

डॉक्टरचं काम हे रुग्णाला दुरुस्त करण्याचं असतं. पण, याठिकाणी हा डॉक्टर सोबत काम करणाऱ्याला हैवानासारखा मारत सुटला आहे. मारहाण झालेला चपराशी आदिवासी समाजाचा आहे. त्यामुळं आदिवासी संघटना आता डॉक्टरच्या विरोधात एकत्र आल्या आहेत. त्यामुळं या डॉक्टरवर काय कारवाई होते ते पाहावे लागेल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून डॉक्टरच्या विरोधात आक्रोश उभाळून आलाय.

संबंधित बातम्या

Sangli Murder | बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि रोहन नाईकचा खून केला!

Jalgaon Attack | मित्राच्या वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग, तरुणावर दोघांचा हल्ला

Chandrapur : मारहाण करणं पडलं महागात, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुखाची मारहाण, गुन्हा दाखल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.