Ajit Pawar : अशाच घरी जा, नवऱ्याच्या पुढे उभं रहा आणि विचारा कशी दिसते?; पूर्व विदर्भात गुलाबी लाट, अजितदादांनी दिली मग दिलखुलास दाद
Ajit Pawar Bhandara : अजितदादांनी राज्यात सध्या गुलाबी लाट आणली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांचे हे गुलाबी कॅम्पनिंग चर्चेचा विषय ठरले आहे. पूर्व विदर्भावर अजितदादांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे जनसन्मान यात्रेला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद दिसला.
अजित पवार यांनी राज्यात गुलाबी लाट आणली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांचे हे गुलाब कॅम्पनिंग चर्चेचा विषय ठरले आहे. महायुतीत अजित पवार गटाबाबत भाजप आणि शिंदे गोटातून प्रतिक्रिया उमटत असते. पण दादांनी सध्या प्रचारावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. जनसन्मान यात्रेतून दादा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मी माझ्या बहीणींना काय योजना दिल्या, बांधवांना काय योजना दिल्या? याची माहिती देण्यासाठी आम्ही फिरतोय. योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, असे दादांनी सांगितले. पूर्व विदर्भावर राष्ट्रवादीचे बारीक लक्ष आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे त्यांच्या कार्यक्रमाला महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला.
दादांकडून कौतुकाची थाप
अजितदादांच्या गुलाबी लाटेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांच्या या गुलाबी आंदोलनामुळे एक सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याविषयी वाढत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. पूर्व विदर्भातील तुमसर येथे त्यांची जनसन्मान यात्रा पोहचली आहे. येथील कार्यक्रमात त्यांनी उपस्थित महिलांचे कौतुक केले. माझ्या माय माऊली पिंक रंगात फेटे घेतले छान दिसता. अशाच घरी जा नवऱ्याच्या पुढे उभं रहा आणि विचारा कशी दिसते. गमतीचा भाग जाऊ द्या. योजना सर्वांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.
अजितदादांचे निवडणुकीविषयी मोठे संकेत
तुमसरने नेहमी राष्ट्रवादीला साथ दिली. उद्याच्या काळात राजू कारमोरे यांना जास्त मतांनी निवडून आणा. आम्ही जास्त निधी देऊ. आम्ही केलेला विकास हेच आम्हाला सांगाल भरपूर आहे. लोकांच्या समस्या आम्ही सोडवत राहीलो चर लोकं आम्हाला साथ देतात. कदाचित पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, असे मोठे संकेत त्यांनी दिले.
लोकसभेला तुम्ही आमच्यापासून दूर गेला. तुम्ही रागावले. आम्ही संविधान बदलणार नाही. आम्ही जयभीम म्हणणारे माणसं. जगाला विचार करायला लावणारे संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं आहे. आम्ही कुणालाही एकटं पडू देणार नाही. पोलीस, प्रशासनाला सुचना देऊ. माझ्या अल्पसंख्यांक समाजाने लक्ष द्या. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चाललोय, असे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार आलं. त्यांच्या विचाराचे सरकार राज्यात आलं तर प्रश्न सुटतील. उद्या विरोधक आले तर ते म्हणेल आमचं काही चालत नाही. आपलं सरकार आलं तर राजू कारमोरे म्हणेल चला दिल्लीला जाऊ. आम्ही केंद्रात जाऊन केंद्रात जाऊन प्रश्न सोडवले. कांदा प्रश्न सोडलं. राज्याची तिजोरी माझ्याकडे आहे. विकासनिधी देत असताना त्या भागातला विकास महत्त्वाचा हे डोळ्यांसमोर ठेवलं. तीन वर्षांत तुमसरसाठी तीन हजार कोटी दिले. घड्याळचं बटन दाबा, पुढच्या वेळेस पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपये मी तुमसरसाठी देणार, असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.