भंडाऱ्यातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कुणावर केलेत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट?

भंडारा येथे तैनात असलेला उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबूकवर (Facebook) त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी आहे. त्यामुळं त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही.

भंडाऱ्यातील पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कुणावर केलेत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट?
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 10:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांबाबत आपत्तीजनक मजकूर पोस्ट करण्यात आले. समाजात वैमनस्य निर्माण करणाऱ्या भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector) सचिन सूर्यवंशीला (Sachin Suryavanshi) निलंबित करण्यात आले. निलंबनासोबतच सूर्यवंशी विरुद्ध प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भंडारा आणि नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भंडारा येथे तैनात असलेला उपनिरीक्षक सूर्यवंशी काही दिवसांपासून नेता आणि व्यवस्थेविरुद्ध वादग्रस्त मजकूर पोस्ट करीत होता. फेसबूकवर (Facebook) त्याच्याशी निगडित व्यक्तींची संख्या कमी आहे. त्यामुळं त्याच्या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नाही.

कोतवाली ठाण्यात तक्रार

गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी गंभीर पोस्ट करीत होता. नेता, त्यांचे कुटुंबीय सोबतच धार्मिक आयोजनांवर वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट सूर्यवंशी टाकत होता. शनिवारी सामाजिक कार्यकर्ता सुशील चौरसिया यांनी नागपूर जिल्ह्याच्या कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.

या कलमान्वये गुन्हा दाखल

पोलिसांनी सूर्यवंशी विरुद्ध 294 295 (अ), 500, 504, आयटी एक्ट 67 नुसार गुन्हा दाखल झाला. ही बाब लक्षात घेता भंडाराचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सूर्यवंशीच्या निलंबनाचा आदेश काढला आहे. विशेष म्हणजे सूर्यवंशी शिपाई म्हणून नागपूर पोलीस दलात सामील झाला होता. त्याने तहसील तसेच पाचपावली ठाण्यात काम केले आहे.

हे सुद्धा वाचा

तपासात निष्काळजीपणा

बंगाली पंजामध्ये गुन्हेगारांच्या दोन गटांत झालेल्या गोळीबाराच्या तपासात निष्काळजीपणा दाखविला होता. त्याबद्दल त्याला तहसील ठाण्यातील नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात त्याची भंडारा येथे बदली झाली. यापूर्वी त्याने फेसबूकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला होता. परंतु कोणी त्याला गांभीर्याने घेतले नव्हते.

वादग्रस्त पोस्ट करणे भोवले

मात्र आता गुन्हा नोंद झाल्यानंतर भंडारा पोलीस अधीक्षकांनी त्याला निलंबित केले. या प्रकरणामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नेमक्या काय पोस्ट त्यानं केल्या होत्या. याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सरकारी नोकरीत असताना अशा वादग्रस्त पोस्ट करणे त्याला भोवले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.