अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सहा संचालकांचे राजीनामे; राजीनामे देण्याचे कारण काय?

२०२० मध्ये तत्कालीन अध्यक्ष महेश जैन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांना अध्यक्ष बनवण्यात आले.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सहा संचालकांचे राजीनामे; राजीनामे देण्याचे कारण काय?
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 3:03 PM

भंडारा : भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतील संचालक मंडळ २०१५ मध्ये सत्तेवर आले. त्यांचा कार्यकाळ हा जून २०२० मध्ये संपला. कोरोना संक्रमणामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. अजूनही त्या झाल्या नाहीत. त्यामुळे विरोधी गटाच्या संचालकांमध्ये धुसफूस सुरू होती. २०२० मध्ये तत्कालीन अध्यक्ष महेश जैन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांना अध्यक्ष बनवण्यात आले. २०२० मध्येच चिंतामण मेहर आणि विलास काटेखाये यांनी राजीनामा दिला होता.

प्रशासक नेमण्याची शक्यता

जयंत वैरागडे, रामदास शहारे, दिनेश गिऱ्हेपुंजे आणि ज्योती बावनकर यांना अपात्र ठरवण्यात आले. सध्या संचालक मंडळात सात सदस्य राहिले. त्यामुळे ही बँक अल्पमतात आलीय. बँकेवर प्रशासन नेमला जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक निर्णय बोर्डाच्या मंजुरीशिवाय नाही

यासंदर्भात बोलताना बँकेचे अध्यक्ष नाना पंचबुद्धे म्हणाले, बँकेतील कोणतेही आर्थिक निर्णय हे बोर्डाच्या मंजुरीशिवाय होत नाहीत. वकिलांच्या फीसवरून राजीनामे देणारे संचालक बोर्डात होते. बोर्डाच्या अधीन राहुनच निर्णय घेण्यात आला. भविष्यात आपण अपात्र होणार अशी भीती त्यांना वाटत असावी, त्यामुळे त्यांनी राजीनामे दिले असावेत. पण, यामुळे कुणीही कारवाईतून सुटणार नसल्याचंही पंचबुद्धे यांनी सांगितलं.

भंडारा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या सहा तसंचालकांनी गुरुवारी सामूहिक राजीनामे दिले आहेत. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र आणि पाचशे कोटी रुपयांवर ठेवी असलेली ही बँक आहे. यापैकी पाच संचालकांनी अध्यक्ष नाना पंचबुद्धे यांच्याकडे तर एका संचालकांना नागपूर विभागीय सहनिबंधकाकडे राजीनामा दिला आहे.

वकिलांच्या फीसवर अतिरिक्त खर्च

यामुळे 19 संचालक मंडळ असलेल्या बँकेतील राजकारण अस्थिर झाले आहे. वकिलांच्या फीसवर अतिरिक्त खर्च झाल्याचे कारण दाखवत संचालकांनी राजांनी दिले आहेत. 19 संचालक असलेल्या या बँकेत राजकारण मागील तीन वर्षापासून ढवळून निघाले आहे.

यांनी दिले राजीनामे

राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी अध्यक्ष महेश जैन, हिरा बांगडकर, लीलाधर वाडिभस्मे, कविता लांजेवार आणि गोपिचंद थवानी यांचा समावेश आहे. उदय मोगलेवार यांनी विभागीय सहनिबंधकांकडे राजीनामा दिला.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.