Car Birthday | भंडाऱ्यात मालकाने साजरा केला चक्क कारचा वाढदिवस, 34 वर्षे अविरत सेवा

कोण कुणाचा वाढदिवस साजरा करेल काही सांगता येत नाही. भंडाऱ्यातील रंजन यांनी त्यांच्या मारुती व्हॅनचा 34 वा वाढदिवस साजरा केला. कित्तेक वर्षांपासून ती आपल्याला प्रवासात मदत करते. म्हणून कारसमोर चक्क केक कापला.

Car Birthday | भंडाऱ्यात मालकाने साजरा केला चक्क कारचा वाढदिवस, 34 वर्षे अविरत सेवा
मोहाडीत कारचा वाढदिवस साजरा करण्यात आला. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:43 AM

भंडारा : भंडाऱ्यात चक्क मारुती व्हॅनचा ( Maruti Van) वाढदिवस साजरा करण्यात आला. ऐकून आश्चर्यचा सुखद धक्का बसला. आतापर्यंत आपण सजीवांचे वाढदिवस बघितले. काही लोकांनी तर कुत्रा- कोंबड्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील मोहाडी (Mohadi) येथील मारुती व्हॅन प्रेमी कारमालक रंजन ढोमने (Ranjan Dhomne) आपल्याला 34 वर्षे दिलेल्या अविरत आठवणीला उजाळा देत चक्क आपल्या मारुती व्हॅनचा वाढदिवस साजरा केला आहे. तुम्हाला दृष्यात नटलेली. सजलेली मारुती व्हॅन आहे. ती नटलेली- सजलेली आहे कारण आज तिचा वाढदिवस आहे. तो ही 34 वा! कोण कुणाचा वाढदिवस साजरा करेल काही सांगता येत नाही. भंडाऱ्यातील रंजन यांनी त्यांच्या मारुती व्हॅनचा 34 वा वाढदिवस साजरा केला. कित्तेक वर्षांपासून ती आपल्याला प्रवासात मदत करते. म्हणून कारसमोर चक्क केक कापला.

अनेक घटनांची साक्षीदार

मोहाडीतील युवा किराणा व्यापारी रंजन ढोमने यांनी आपल्या मारुती व्हॅनचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा केला आहे. ढोमने कुटुंबाने 1987 साली ही मारुती व्हॅन बुक केली होती. 1990 ती ढोमने कुटुंबाची सदस्य झाली. त्या साली मोहाडीत एकच मारुती व्हॅन असल्याने लोकं तिला बघण्यासाठी ढोमने यांच्याकडं यायचे. अनेक सुखद प्रसंग असो की दुखद घटना तिच्या संगतीने त्यांनी प्रवास केला. अगदी देवदर्शनाची ती साक्षीदार ठरली.

थाटात केक कापला

आज तिला 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिच्या अनेक आठवणी उजाळा देत तिच्या कार प्रेमी मालकाने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यासाठी तिला सजवून मारुती व्हॅनसमोर थाटात केक कापण्यात आला. औक्षण करून ढोमणे कुटुंबानी एक प्रकारे सेलिब्रेशन करत साजरा केला आहे. आता जणू ती घरचा सदस्यच झाली आहे. तिला विकण्याची मुळीच इच्छा नसल्याचे मालक रंजन ढोमने, रंजनची आई किरण ढोमने व रंजनची ताई कामिनी ढोमने सांगतात. आज वाहतुकीचे अनेक नियम आले आहेत. गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट, गाडीची लाइफ आदी गोष्टी महत्वाचा मानल्या जात आहे. तरीही घरचा सदस्य असल्यानं तिला विकायचं नाही, असं मालकानं ठरविलंय.

Nagpur Water | पाण्याचा कमी दाबाने पुरवठा, पाणी चोरांवर मनपाची कारवाई, नागपुरात टिल्लू पंप जप्त

Narayan Rane | तीन पक्षांचं सरकार जूनमध्ये कोसळणार; वाशिममध्ये नारायण राणे यांनी वर्तविले भाकीत

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.