Bhandara Attack : भंडाऱ्यात मावाच्या वादातून मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला, दोन आरोपी अटकेत

वाद इतका विकोपाला गेला की या वादात भारत व त्याचा मित्र सरोज शहारे याने आपल्या जवळील चाकू काढून विशालच्या पोटावर तसेच छातीवरही सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. लागलीच जखमी विशालने भंडारा शहर पोलिस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली.

Bhandara Attack : भंडाऱ्यात मावाच्या वादातून मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला, दोन आरोपी अटकेत
भंडाऱ्यात मावाच्या वादातून मित्रावर चाकूने प्राणघातक हल्लाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 4:09 PM

भंडारा : “नेहमी मलाच खर्रा का मागतो स्वतः पैशाने घे” म्हणत मित्राने मित्राला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. चित्रपटगृहात सिनेमा बघताना खर्रा (मावा) मागणे एका मित्राला चांगलेच महागात पडले आहे. खर्रावरुन झालेल्या वादात मित्रानेच मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला (Attack) करत गंभीर जखमी (Injured) केल्याची घटना भंडारा शहरात घडली आहे. विशाल विजय लिमजे (28) रा. लाला लजपतराय वॉर्ड भंडारा असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोघां विरोधात भंडारा शहर पोलिसात गुन्हा नोंद करत त्यांना अटक (Arrest) केली आहे. भारत गुलाब कंगाले (30) रा. केसलवाडा भंडारा व सरोज शहारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मित्राकडे खर्रा मागितला म्हणून केला हल्ला

कामातून थोडी सवड मिळावी म्हणून जखमी विशाल आपल्या मित्रासोबत भंडारा शहरातील आदर्श टॉकीजमध्ये रात्री सिनेमा पहायला गेला होता. दरम्यान विशालने त्यावेळी बाजूला बसलेल्या भारत गुलाब कंगाले याच्याकडे खर्रा मागितला. “नेहमी मलाच खर्रा मागतो स्वतः पैशाने घे” असे भारतने विशालला म्हणताच त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की या वादात भारत व त्याचा मित्र सरोज शहारे याने आपल्या जवळील चाकू काढून विशालच्या पोटावर तसेच छातीवरही सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. लागलीच जखमी विशालने भंडारा शहर पोलिस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जखमी विशालला भंडारा सामान्य उपचारासाठी दाखिल करत पोलिसांनी आरोपी भारत गुलाब कंगाले आणि सरोज शहारे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवित उशीरा रात्री अटक केली आहे. एका क्षुल्कक कारणाने घडलेल्या ह्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून तरुणात वाढलेल्या गुन्हेगारीने चिंतेतही भर पडली आहे. (Two accused arrested in knife attack on a friend over a minor dispute in Bhandara)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.