जलपर्यटनाला चालना मिळणार, इतक्या एकर जागेसाठी सामंजस्य करार; यामुळे हे साध्य होणार

ही प्रक्रिया येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागून विकास व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे.

जलपर्यटनाला चालना मिळणार, इतक्या एकर जागेसाठी सामंजस्य करार; यामुळे हे साध्य होणार
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:24 AM

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी गोसे धरणाला भेट दिली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यटन विभागात असलेल्या गोसे जल पर्यटनाच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची घोषणा केली होती. काही दिवसांतच या प्रकल्पाकरिता असलेल्या 250 कोटी रुपयांपैकी पहिला टप्पा म्हणून 102 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानंतर गोसेच्या जलपर्यटनाच्या कामाला वेग आला. आता हालचाली होऊ लागल्या आहेत. त्या विकासकामात आता भर पडली आहे.

करारनाम्यावर सह्या

जिल्ह्यातील रोजगार आणि पर्यटनात वरदान ठरू पाहणाऱ्या गोसे जल पर्यटनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. 102 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यांतर्गत जल पर्यटनासाठी गोसेच्या आवश्यक 450 एकर जागेकरिता सामंजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्यात करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा आणि डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत करारनाम्यावर सह्या करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

450 एकर जागेसाठी सामंजस्य करार

या वाटचालीत आता 450 एकर जागेसाठीच्या सामंजस्य कराराचीही भर पडली आहे. यामुळे भविष्यात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. ही प्रक्रिया येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागून विकास व्हावा अशी जनतेची अपेक्षा आहे.

गोसीखुर्द येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि एमटीडीसी यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

यावेळी सोबत जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि सचिव (प्रकल्प समन्वय) राजेंद्रकुमार मोहिते, नागपूरचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे, वैजनाथ बुरडकर, अखिलेश शुक्ला, कार्यकारी अभियंता विनय वावधने उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.