या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला, चार दरवाजे पुर्णपणे बंद

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे पीके धोक्यात आली आहेत.

या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला, चार दरवाजे पुर्णपणे बंद
धरण
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 12:07 PM

महाराष्ट्र : जून महिना कोरडा गेल्यानंतर अनेक शेतकरी (farmer news) चिंतेत होते. कारण उशिरा पेरणी केल्यानंतर पीक व्यवस्थित येईल का ? अशी त्यांना चिंता होती. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाची (Agricultural department) मदत घेतली होती. जुलै महिन्यात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस (heavy rain) झाला आहे. त्या जिल्ह्यात अधिक पाऊस झाला आहे. तिथली धरण पुर्णपणे भरली आहेत. ज्या धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे.

पाऊस थांबल्यानं पाण्याचा विसर्ग होणार कमी

मागील चार दिवस गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालं आहे. धरणाचे सर्व दरवाजे उघडले होते. त्यामुळे 1 लाख 87 हजार 204 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीच्या पात्रात सोडण्यात आला होता. सातत्यानं पाऊस पडत असल्यानं धरणाचे गेट एक मीटरनं वाढविण्याची शक्यता धरण प्रशासनानं व्यक्त केली होती. काल पावसाने विश्रांती घेतल्यामुळे 33 गेट पैकी 4 गेट बंद करण्यात आले आहेत. आता 29 गेट अर्धा मीटरनं उघडून त्यातून 1 लाख 17 हजार 540 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाची परिस्थिती पाहून धरणाचे गेट कमी जास्त प्रमाणात करण्यात येणार असल्यानं नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावं, असं आवाहन धरण प्रशासनानं नागरिकांना केलं आहे.

हे सुद्धा वाचा

भंडारदरा धरण 95 टक्के भरले ; मात्र जिल्हयात पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण 95 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे 11 टिएमसी क्षमता असलेले धरण 95 टक्के भरल्याने सगळीकडं आनंदाचे वातावरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर विभागातील शेती उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवणारे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पुर्ण क्षमतेने भरत आले आहे. धरणाचा पाणीसाठा 95 टक्क्यांवर पुढे आहे. विशेष म्हणजे पाणी उसळी मारत असल्यामुळे धरणाच्या भिंतीवरुन पाणी बाहेर पडत आहे. धरण भरल्यामुळं शेतकरी समाधानी आहेत. परंतु पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पिकांना धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.