Bhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 24 तासानंतरही बचावकार्य सुरु

भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. (Bhiwandi building collapse 6 People dead in one Family)

Bhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 24 तासानंतरही बचावकार्य सुरु
Follow us
| Updated on: Sep 22, 2020 | 12:30 PM

भिवंडी : भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश आहे. अद्याप या कुटुंबातील मुलगा आणि तीन नातू ढिगाऱ्याखाली अडकले आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे  या दुर्घटनेला 24 तास उलटूनही अद्याप ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. (Bhiwandi building collapse 6 People dead in one Family)

भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली याच कुटुंबातील चौघेजण अडकले आहेत. त्यात मुलगा आणि 3 नातवांचा समावेश आहे. तर एक मुलगा आणि सूनेचा मृतदेह रात्री बाहेर काढण्यात आला आहे. या कुटुंबाातील नातेवाईक शेख युसूफ आपल्या कुटुंबियांचे मृतदेह बाहेर काढण्याची वाटत पाहत दु:खी अवस्थेत बसून आहेत.

नेमकं प्रकरणं काय?

भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली. पहाटे 3.40 च्या सुमारात ही दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.

या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला 24 तास उलटूनही अद्याप ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इमारतीतील अजून काही व्यक्ती या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं बोललं जात आहे.

या दुर्घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील. तर जखमी झालेल्या नागरिकांचा खर्च शासन उचलेल अशी घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Bhiwandi building collapse 6 People dead in one Family)

संबंधित बातम्या : 

Mahad Building Collapse | 35 जणांचे प्राण वाचवताना दोन पाय गमावले, महाडच्या नावेदला शिवसेनेकडून 2 लाखांची मदत

Bhiwandi building Collapse | भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.