भोसरी जमीन घोटाळा; एकनाथ खडसेंची पुन्हा अँटी करप्शन कडून नव्याने चौकशी

याप्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत. अँटीकरप्शन विभागाच्या वतीने देखील दोन वेळा चौकशी झाली. 18 महिन्यांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. असं असताना अँटी करप्शन कडून पुन्हा नव्याने चौकशीची करून यात काय तथ्य काढणार आहे असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. हा तपास म्हणजे केवळ छळ करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

भोसरी जमीन घोटाळा; एकनाथ खडसेंची पुन्हा अँटी करप्शन कडून नव्याने चौकशी
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 4:38 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा सासेमिरा लागणार आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी (Bhosri Land Scam) एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभागानं खडसे यांच्यावर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. यामुळे खडसे यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागू शकते. 18 महिन्यापूर्वी पुणे अँटी करप्शन विभागाने क्लोजर रिपोर्ट सादर करूनही नव्याने चौकशी करून आता काय तथ्य काढणार? ही चौकशी म्हणजे छळ असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

भोसरी घोटाळा प्रकरणी खडसे यांना 2018 मध्ये ‘क्लीन चिट’ मिळाली

भोसरी भूखंडा प्रकरणी एकनाथ खडसे यांची नव्याने चौकशी करण्याची मागणी पुणे अँटी करप्शन विभागाच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली आहे . या प्रकरणी एकाथ खडसेंची अनेकदा चौकशी झाली होती. भोसरी घोटाळा प्रकरणी खडसे यांना 2018 मध्ये ‘क्लीन चिट’ मिळाली होती. मात्र, राज्यात सत्तापालट होताच खडसेंच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

तपास म्हणजे केवळ छळ करण्याचा प्रयत्न – एकनाथ खडसे

याप्रकरणी अनेक चौकशा झाल्या आहेत. अँटीकरप्शन विभागाच्या वतीने देखील दोन वेळा चौकशी झाली. 18 महिन्यांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर करून या प्रकरणात कुठलेही तथ्य नसल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. असं असताना अँटी करप्शन कडून पुन्हा नव्याने चौकशीची करून यात काय तथ्य काढणार आहे असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. हा तपास म्हणजे केवळ छळ करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा

2016 मध्ये फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. सामीजीक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला होता.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...