भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात सध्या माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत.

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर
एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 12:15 PM

मुंबई – भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात सध्या माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मंदाकिनी यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना कोर्टाकडून जरी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला असला, तरी देखील त्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावेत असे आदेश त्यांना न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. त्यानूसार मंदाकिनी खडसे या ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांची आज दिवसभर चौकशी करण्यात येणार आहे.  दरम्यान याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीकडून एकनाथ खडसे यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली होती. यामध्ये  लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.

आरोप झाल्यानंतर गमावावे लागले मंत्रीपद 

एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्यातील भोसरीमध्ये जमीन घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले होते.  आरोप झाल्यानंतर खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. चौकशी निपक्षपातीपणे व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे खडसे यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मंत्रीपद गेल्याने खडसे हे पक्षावर नाराज होते, त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. परंतु खडसे यांची पक्षात योग्य ती दखल घेण्यात न आल्याने अखेर त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं. याप्रकणी आता इकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी आणि परिवाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

संबंधित बातम्या 

अरे काही तरी चांगलं बोला; ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवार यांचं सूचक मौन

अनिल परब शुद्धीत नव्हते, ईडीला काय कबुली जबाब दिला हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे काय?; किरीट सोमय्यांचा सवाल

कृषिमंत्री म्हणतायत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तर विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे भुसे यांच्या घरासमोर आंदोलन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.