अमृत महोत्सवानिमित्त भुजबळांनी सोडला नेत्रदानाचा संकल्प; 74 लाख नागरिकांना मोहिमेत सहभागी करून घेणार

राज्याचे मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अमृत महोत्सवानिमित्त नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे.

अमृत महोत्सवानिमित्त भुजबळांनी सोडला नेत्रदानाचा संकल्प; 74 लाख नागरिकांना मोहिमेत सहभागी करून घेणार
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 5:06 PM

नाशिकः राज्याचे मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अमृत महोत्सवानिमित्त नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे. सोबतच या मोहिमेत तब्बल 74 लाख नागरिकांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा 74 वा वाढदिवस शुक्रवारी, 15 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानमित्त रुग्णवाहिका लोकार्पण, अंध बांधवांना साहित्याचे वाटप, पुस्तक प्रकाशन, वेबसाइटचे लोकार्पण, नेत्रदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पालमंत्री भुजबळांनी स्वतःही नेत्रदानाचा संकल्प सोडला. विशेष म्हणजे भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 74 लाख नागरिकांचे नेत्रदान करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला. त्यासाठी भुजबळांनी स्वतःचे नाव नोंदविले, सोबतच इतरांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले. दरम्यान, भुजबळांच्या वाढदिविसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा यथासांग आढावा घेणारी एक वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे. chhaganbhujbal.in या वेबसाइटवर त्यांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. भुजबळांचे कार्य तळागळातील जनतेला समजावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

फडणवीसांवर जोरदार टीका

कित्येक मुख्यमंत्री येतात आणि जातात. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसारखे काहीच जण लक्षात राहतात. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस तर क्लीन चीट देऊन टाकायचे. त्यांना तेव्हा ‘क्लीन मास्टर’ म्हटले जायचे, असा घणाघात शनिवारी मंत्री छगन भुजबळ यांनी केला. छगन भुजबळांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौफेर फटकेबाजी केली. विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी सडकून टीका केली. मंत्री भुजबळ म्हणाले, देवेंद्र फडणीस यांना पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर देणं आवश्यकच होतं. कारण देवेंद्र फडणीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना क्लीन चीट देऊन टाकायचे. उद्धव ठाकरे यांच्याकडे हा गुण नाही. अहो इतकेच काय, फडणवीसांना शेवटी-शेवटी तरी चक्क ‘क्लीन मास्टर’ म्हंटलं जायचं, असं म्हणत त्यांनी देवेंद्र यांना लक्ष केलं.

देवेंद्र फडणीस यांना पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर देणं आवश्यकच होतं. कारण देवेंद्र फडणीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना क्लीन चीट देऊन टाकायचे. उद्धव ठाकरे यांच्याकडे हा गुण नाही. अहो इतकेच काय, फडणवीसांना शेवटी-शेवटी तरी चक्क ‘क्लीन मास्टर’ म्हंटलं जायचं. – छगन भुजबळ, मंत्री

इतर बातम्याः

डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांक

लाल कांदा तळपलाः नाशिकमध्ये क्विंटलमागे 5151 रुपयांचा भाव; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेची झुळुक!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.