Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसरा मेळाव्याच्या निकालावर भुजबळ काय म्हणाले ? निशाणीचं समजू शकतो पण…

दसरा मेळाव्याबाबत सुप्रीम कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा वेळ शक्ती दाखवायला घाला असा सल्लाही भुजबळ यांनी शिंदे आणि ठाकरेंना दिला आहे.

दसरा मेळाव्याच्या निकालावर भुजबळ काय म्हणाले ? निशाणीचं समजू शकतो पण...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 7:41 PM

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dussehra gathering) निकालावर भाष्य केले आहे. दसरा मेळाव्याबाबत आता प्रश्न मिटला असून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क बाबत (Shivaji Park) परवानगी मिळायला पाहिजे असा आग्रह होता. शेवटी त्यांना ते मिळालं असे भुजबळ यांनी म्हंटलं आहे. याशिवाय बीकेसी (BKC) ग्राऊंड पण मोठे आहे. शिंदे तिकडे करणार आहे. कोणी इकडे घ्या तिकडे घ्या फरक पडत नाही. निशाणीचा विषय असता तर समजू शकतो तिथं मतदान असतं. पण सभेच्या जागेसाठी भांडण असायचे कारण नव्हतं असे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. यावेळी भुजबळ यांनी शिवसेनेत असतांना मी देखील शिवतीर्थावर भाषण करायचो असे सांगत दसरा मेळाव्याबाबतची आठवण बोलून दाखवली आहे.

दसरा मेळाव्याबाबत सुप्रीम कोर्टात वेळ घालवण्यापेक्षा तुमचा वेळ शक्ती दाखवायला घाला असा सल्लाही भुजबळ यांनी शिंदे आणि ठाकरेंना दिला आहे.

अलीकडे सोशल मीडिया असल्याने चिन्हाचाही फरक पडत नाही पण मेळाव्यावरुण भांडण नको असे देखील भुजबळांनी म्हंटले आहे.

शेवटी मीडियावरून हे सगळं महाराष्ट्र बघणार आहेच पण दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे त्यासाठी ही सगळं घडल्याचेही भुजबळांनी बोलून दाखवलेय.

छगन भुजबळ हे शिवसेनेत असतांना त्यांनी दसरा मेळावा हा जवळून बघितला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण देखील ऐकले असून त्यांनी देखील दसरा मेळाव्यात भाषण केल्याची आठवण सांगितली आहे.

नाशिक येथील भुजबळ फार्म या निवासस्थानी माध्यमांशी बोलतांना भुजबळांनी दसरा मेळाव्यात प्रतिक्रिया देत शिंदे आणि ठाकरेंना वडीलकीचा सल्लाही दिला आहे.

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.