पुण्यासाठी मोठी घोषणा! थिएटर, नाट्यगृह पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, नव्या व्हेरीएंटवर काय म्हणाले अजित पवार?
पुणेकरांना ग्वाही देतोय ज्या वेळी राज्याचा हिस्सा हवा त्यावेळी दिला जाईल कोणतीही अडचण येणार नाही. पुणे विद्यापीठातील दुहेरी पुलाचे डिझायनचे तयार आहे. लवकरच त्याचे काम सुरु करणार.
पुणे – येत्या 1 डिसेंबरपासून कोरोना नियमात शिथिलता आणत शहरतील सर्व चित्रपटगृहे, सांस्कृतिक केंद्रे पूर्ण क्षमेतेने सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहिल. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेता असताना सर्वकाही सुरळीत चालेले असल्याचे दिसून आले आहे. आढावा बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
जम्बो रुग्णालय बंद न करण्याचा निर्णय
पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनासाठी तयार करण्यात आलेली जम्बो रुग्णालय बंद न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जागतिक स्तरावर नव्याने सापडलेल्या कोरोना व्हेरियंट आला आहे. यासगळ्याचा एकंदरीत अंदाज घेतला जाईल. त्यानंतरच्या 31 डिसेंबरला या जम्बो रुग्णालये सुरु ठेवायची की बंद करायची हा निर्णय घेतला जाईल.
पीपीपी तत्वावर होणारा पहिलाच प्रकल्प
23 किमी लाबीचा 23 स्टेशन असणारा पीपीपी तत्वावर प्रकल्प सुरू करायला सांगितले आहे. 40 महिन्यात हा प्रकल्प पुर्ण करण्याचा मानस आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच कामाचे मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला कि भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र काम काम थांबायला नको म्हणून काम सुरू करतोय. पीपीपी तत्वावर होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. सर्व परवानग्या प्राप्त झाल्यात कार डेपोसाठी 13 एकर जागा दिली आहे.
राज्य सरकारने आर्थिक सहभाग मंजूर केला आहे. पुणेकरांना ग्वाही देतोय ज्या वेळी राज्याचा हिस्सा हवा त्यावेळी दिला जाईल कोणतीही अडचण येणार नाही. पुणे विद्यापीठातील दुहेरी पुलाचे डिझायनचे तयार आहे. लवकरच त्याचे काम सुरु करणार. यासाठी तिथल्या वाहतुकीचं काय नियोजन काय अशी विचारणा केली आहे . त्यासाठी पुणे महापालिकेची मदत,पोलिसांची मदत, विद्यापीठाची मदत हवी आहे. अशा प्रकारे सर्वांची चर्चा केली आहे. हे काम लवकरच सुरु होईल अशी माहिती पवारांनी दिली आहे.
विमानतळावरील तपासणी बंद
बाहेरील राज्यातून हवाई प्रवास करून येणाऱ्या प्रवाश्यांची यापुढे विमातळावर पुन्हा कोरोनाबाबतच्या कागद पात्रांची तपासणी केली जाणार नाही. हवाई प्रवास करणारे सर्व प्रवासी हे प्रवास सुरु कारण्यापूर्वीच कोरोनाच्या सर्व तपासण्या तसेच लसीकरणाची माहिती देऊनच प्रवासाला सुरुवात करतात. त्यामुळं ते प्रवासी पुण्यात पोहचल्यानंतर त्याचा कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दोन- अडीच तास रांगेत थांबण्याची गरज नाही. त्यामुळे यापुढे बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार नाही. परंतु ज्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने घालून दिलेलया नियमावलीचे पालन केले जाईल .
बोगस भरतीत दोषी आढळल्यास कारवाई करू 23 गावांचा महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बोगस भरती झाल्याचे माझ्या कानावर आले आहेत. मागच रेकॉर्ड बघितले तर तिथे एवढ्या मोठयाप्रमाणात लोक नव्हेत. यात चुकीचं काही झालं असले तर दुरुस्ती केली जाईल. दोषी आढळ्यास कारवाई केली जाईल.
paytm : गेल्या 3 महिन्यात पेटीएमला 482 कोटींचा फटका, युजर्सच्या संख्येत चांगली वाढ
महाराष्ट्रात 36.09 टक्के लोकसंख्या कुपोषित, NITI आयोगाच्या अहवालात आकडे जाहीर