Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: मोठी बातमी, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसाममध्ये नेलं जाणार, सुरत एअरपोर्टवर विमान सज्ज, आमदार पळून जातील, शिंदेंना भीती

हे आमदार मुंबईत परततील, तसेच हॉटेलातून पळून जाण्याची भीती एकनाथ शिंदेंना असल्याची माहिती आहे, त्यामुळेच या आमदारांना थेट आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात येणार आहे. त्यासाठी तीन चार्टर प्लेनही तयार ठेवण्यात आले आहेत. एकूणच हा सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे हे संकेत आहेत.

Eknath Shinde: मोठी बातमी, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आसाममध्ये नेलं जाणार, सुरत एअरपोर्टवर विमान सज्ज, आमदार पळून जातील, शिंदेंना भीती
Sena MLA Surat AirportImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:39 PM

मुंबई- शिवसेनेत बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि शेवसेनेचे नेते आणखी अनरिचेबल होण्याची शक्यता आहे, कारण या सगळ्या आमदारांना आसाममध्ये (Guvahati, Aasam)नेलं जाणार आहे. त्यांना रात्रीतून एयर लिफ्ट (Air lift)करुन त्यांना आसाममध्ये गुवाहाटीला नेलं जाण्याची माहिती आहे. यासाठीचे विमान सुरत एयरपोर्टवर आलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी सोबत आणलेल्या काही आमदारांना आपण कुठे नेले जात आहे, याची महितीच रात्री नव्हती, अशीही माहिती समोर येते आहे. त्यामुळे आता हे आमदार मुंबईत परततील, तसेच हॉटेलातून पळून जाण्याची भीती एकनाथ शिंदेंना असल्याची माहिती आहे, त्यामुळेच या आमदारांना थेट आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात येणार आहे. त्यासाठी तीन चार्टर प्लेनही तयार ठेवण्यात आले आहेत. एकूणच हा सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे हे संकेत आहेत.

अनेक आमदारांना कुठे जातोय हे माहीतच नव्ह्ते

सूरतमध्ये आलेल्या शिसेनेच्या आमदारांपैकी काही जण हे एकनाथ शिंदेंच्या गटाचे आहेत, मात्र काही आमदारांना रात्री वसईला बोलवण्यात आले, तिथून स्नेहभोजन आहे, असे सांगून सुरतला नेण्यात आल्याची माहिती आहे. यातील ३ ते ४ आमदार हे रात्रीतून पालघर सीमेवरुन चिखलातून चालत पळून आल्याची माहिती आहे. अशा स्थितीत आणखी काही आमदारही सुरतमधून जातील अशी शक्यता आहे, त्यामुळेच त्यांना आसाममध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाचे आमदार, पदाधिकारी हॉटेलमध्ये अपस्थित

दरम्यान ली मेरेटियन हॉटेलात भाजपाचे आमदार मोहित कम्बोज असल्याचे फोटो बाहेर आले आहेत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भापाचे आणखीही काही नेते आणि पदाधिकारी तिथे पोहचले आहेत. आता आसामामध्ये हे आमदार नेल्यानंतर, त्यांचा राज्याशी संपर्क होणे थोडे अवघड आहे. दरम्यान आमदार नितीन देशमुख यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यांना पाहण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते. त्यांना घेऊन शिंदे हॉटेल ली मेरेडियन यांना नेण्यात आल्याची माहिती आहे. सूरतमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री शिवसेनेच्या आमदारांना गुवाहाटीला नेण्यात येण्याची शक्यता आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.