J P Nadda | महाराष्ट्रातही शिवसेना संपतेय, एक दिवस देशात फक्त भाजपाच राहील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या वक्तव्यावरून खळबळ

भाजप अत्यंत विचारपूर्वक हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवतोय. मात्र या देशात अजूनही लोकशाही आहे. लोक सगळं बघतायत, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

J P Nadda | महाराष्ट्रातही शिवसेना संपतेय, एक दिवस देशात फक्त भाजपाच राहील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या वक्तव्यावरून खळबळ
जे पी नड्डा, अमित शहाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 3:19 PM

पाटणा (बिहार): बिहारची राजधानी पाटणा (Bihar Patna) येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांनी केलेल्या एका वक्तव्याने देशभरात सध्या खळबळ माजली आहे. आता महाराष्ट्रातही शिवसेना संपुष्टात येतेय. इतर राज्यातही अशीच स्थिती आहे.  देशातील सर्व राजकीय पक्ष एक दिवस संपतील. फक्त भाजप शिल्लक रहिल, या उद्देशाने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे, असं जे पी नड्डा म्हणाले. पाटण्यात जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी भाजप कार्यालयात खासदार आणि आमदारांची नुकतीच बैठक घेतली. भाजपने येथे दोन दिवसीय कार्यसमितीची बैठक घेतली. या बैठकांचे पाच सत्र झाले. कार्यक्रमाच्या संमारोपाला अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी भविष्यात देशात एकही असा पक्ष उरायला नको, जो भाजपच्या विरुद्ध ळढेल. जेणेकरून इतर सर्व राजकीय पक्ष संपून जातील, फक्त भाजपा उरेल, असं वक्तव्य जे पी नड्डा यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्रातदेखील संजय राऊतांविरोधातील कारवाईमुळे आधीच राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे जे पी नड्डांच्या वक्तव्यावरून राज्यातही टीका केली जातेय.

जे पी नड्डांचं वक्तव्य काय?

बिहारमधील भाजपाच्या 16 जिल्हा पक्ष कार्यालयाचं उद्घाटन जेपी नड्डा यांच्या हस्ते झालं. यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना जे पी नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढवला. सध्या देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपविरोधात लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रातदेखील शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उरलेले पक्षही संपतील. देशात फक्त भाजप शिल्लक राहील, असा दावा जे पी नड्डा यांनी केला. आता कोणताही पक्ष भाजपाला मात देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेस तर आता बहीण-भावाचा पक्ष

भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना जे पी नड्डा म्हणाले, बिहारमध्ये आम्ही राजदविरोधात लढत आहोत. तो एक घराणेशाहीचा पक्ष आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी हादेखील असाच पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू यांचाही एकाच व्यक्तीचा पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. याच प्रकारे काँग्रेससुद्धा आता बहीण-भावाचा पक्ष उरलाय.

देशात लोकशाही शिलल्क आहे…- अनिल देसाई

महाराष्ट्रात शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी जेपी नड्डांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. नड्डा हे शक्तीशाली नेते आहेत. भाजप अत्यंत विचारपूर्वक हा राष्ट्रीय कार्यक्रम राबवतोय. मात्र या देशात अजूनही लोकशाही आहे. लोक सगळं बघतायत, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.