महाजनांच्या बैठकीवरून नाथाभाऊंचा तिळपापड; भाजप भुईसपाट होत चालल्याचे साधले शरसंधान

दुसरीकडे राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून नाशिककडे पाहिले जाते. या महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा आता सुरू झालीय. यापूर्वी गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये लक्ष घातले होते. मात्र, त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे सूत म्हणावे तसे जुळले नाही. सध्या नाशिकचे प्रभारीपद जयकुमार रावल यांच्याकडे आहे.

महाजनांच्या बैठकीवरून नाथाभाऊंचा तिळपापड; भाजप भुईसपाट होत चालल्याचे साधले शरसंधान
गिरीश महाजन- एकनाथ खडसे वादाचा दुसरा एपिसोड
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:37 AM

जळगावः भाजपमध्ये (BJP) असताना पहिल्या फळीत असणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे एकमेकांवरील प्रेम उभ्या महाराष्ट्राला ठावुक आहे. त्यात पक्षातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीमय झालेल्या नाथाभाऊंनी भाजपवरचे हल्ले अती तीव्र केले आहेत. ते गिरीश महाजनांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतायत. त्यापार्श्वभूमीवर महाजनांनी बैठक घेतली. त्यानंतर नाथाभाऊ पुन्हा आक्रमक झाले. आता जळगाव जिल्ह्यातून भाजप भुईसपाट होत चाललीय, असे शरसंधान त्यांनी यावेळी साधले. काय म्हणाले नाथाभाऊ जाणून घेऊयात.

भाजपचे स्वबळ

आगामी काळातील जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते गिरीश महाजनांनी जळगावात जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचा इशारा दिला. निवडणुका कधीही जाहीर होऊ द्या. मात्र, कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

खडसेंची टीका

भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे समजताच एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. खरे तर भाजपची नगरपालिका, नगपंचायत निवडणुकीवर ताकद दिसून आली. जळगाव जिल्ह्यात भाजप भुईसपाट होत चालली आहे. खरे तर ही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची झलक आहे, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आता भाजप नेते गिरीश महाजन याला कसे उत्तर देतात ते पाहावे लागेल. दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातही सतत कलगीतुरा रंगत आहे.

महाजनांचा पत्ता कट होणार?

दुसरीकडे राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून नाशिककडे पाहिले जाते. या महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा आता सुरू झालीय. यापूर्वी गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये लक्ष घातले होते. मात्र, त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे सूत म्हणावे तसे जुळले नाही. सध्या नाशिकचे प्रभारीपद जयकुमार रावल यांच्याकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीचे नेतृत्व कोण करणार, याची उत्सुकता आहे. कदाचित देवेंद्र फडणवीस उद्याच्या दौऱ्यात याबाबत संकेत देऊ शकतात.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.