‘उद्धव ठाकरे, असेल हिंमत तर घ्या जगदंबेची शपथ आणि सांगा….’, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ललकारलं

भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पोहरादेवीची शपथ घेऊन अमित शाह यांच्यासोबत 2019 मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेत काय फॉर्म्युला ठरला होता, याबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर आता बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंजच दिलं आहे.

'उद्धव ठाकरे, असेल हिंमत तर घ्या जगदंबेची शपथ आणि सांगा....', चंद्रशेखर बावनकुळे यांनी ललकारलं
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 6:24 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल भाषण करताना पोहरादेवीची शपथ घेत सांगितलं होतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यांनी जगदंबेची शपथ घेऊनही हीच गोष्ट सांगितली. पण दुसरीकडे भाजपकडून याबाबत खंडन केलं जातंय. मुख्यमंत्रीपदाबाबत तसा काहीच फॉर्म्युला ठरला नव्हता, असं भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात येतंय. उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा याबाबतचा उल्लेख केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना शपथ घेऊन खुलासा करण्याचं आव्हान दिलं आहे.

“उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा. पण, सध्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या “शपथा” का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट चॅलेंज देवून टाकलं.

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय आव्हान दिलं?

“2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे फोन तुम्ही का घेतले नाहीत ? घ्या, जगदंबेची शपथ! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे “सुत ” आहात, तर आता सांगाच तुमचे “सुत” कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता”, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी एक व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांचं त्यांचा पक्ष वाढवणं हे कामच आहे. पण ते विदर्भात येवून ज्या पद्धतीने बोलत आहेत, खरंतर अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीचे पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.