AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणि तरीही मी पोलीसांसमोर हजर होणार, फडणवीसांची घोषणा, मुंबईकरांचा रविवार उद्या राजकीयदृष्ट्या टाईट जाणार

राज्य सरकारने केलेल्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ' पहिल्यांदा स्पष्ट करतो, जरी मला प्रीव्हिलेज आहे , माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिलीय. बाहेर येऊ दिली नाही, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

आणि तरीही मी पोलीसांसमोर हजर होणार, फडणवीसांची घोषणा, मुंबईकरांचा रविवार उद्या राजकीयदृष्ट्या टाईट जाणार
बीकेसी पोलीस स्टेशनच्या चौकशीला सामोरे जाणार- देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 1:43 PM
Share

मुंबईः विरोधी पक्ष नेत्याच्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांचे घोटाळे मी बाहेर काढू शकतो आणि माझ्या माहितीचे स्रोत कुणीही मला विचारू शकत नाही, असा नियम आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकारच्या गृहमंत्रालयातील महाघोटाळ्यासंदर्भात मला अशाच चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. उद्या बीकेसी येथील पोलीसांसमोर मी हजर होईन, त्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे देईन, असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरोधात भाजप असा सामना गेल्या अनेक दिवसांपासून रंगलाय आणि दिवसेंदिवस यातील आक्रमकता वाढत चालली आहे. याचाच एक अंक उद्या मुंबईत पहायला मिळणार आहे. बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला भाजपचे मातब्बर नेते देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाणार असून राजकीय वर्तुळात एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा या निमित्ताने होऊ शकतो.

घोटाळेबाजांऐवजी उघड करणाऱ्यांवरच चौकशीचा फेरा

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांना चौकशीसाठी सामोरे जावे लागणार असल्याची बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. या बातमीला दुजोरा देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडी सरकारमधील गृहविभागातला महाघोटाळा मी मार्च 2021 उघडकीस आणला होता. माझ्याकडे यासंदर्भातील ट्रान्सस्क्रिप्ट, पेनड्राइव्ह सगळं माझ्याकडे आहे, हे सांगितलं होतं. ते देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय, हे म्हटलं होतं. त्यानुसार, जी काही घोटाळ्याची माहिती होती, ती सगळी माहिती त्याच दिवशी दिल्लीला गेलो आणि होम सेक्रेटरी यांना सगळी माहिती सादर केली होती. त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून मा. न्यायालयाने यासंदर्भातली सगळी चौकशी सीबीआयला सुपूर्द केली आहे. बदल्यांसंदर्भातील घोट्ळ्याची चौकशी सीबीआय करतेय. अनिल देशमुखांची चौकशी होतेय. हे तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत. अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येत आहेत. मात्र ज्यावेळी सीबीआयला चौकशी ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने घोटाळा दाबण्याकरिता एफआयआर दाखल केला. ऑफिसिअल सिक्रेट अॅक्टमधील माहिती लिक कशी झाली, असा एफआयआर दाखल केला. यासंदर्भात मला पोलिसांच्यावरीते प्रश्न पाठवण्यात आले. मी उत्तर दिलं होतं की, याची माहिती देईन. खरं तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेते म्हणून माझी माहिती कुठून आली, याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. तथापि, मला पुन्हा एकदा प्रश्नावली पाठवण्यात आली आणि कोर्टात सांगण्यात आलं की मी उत्तर देत नाहीये. काल मुंबई पोलिसांनी मला सीआरपीसी 160 ची नोटीस पाठवली. याच बदल्यांच्या घोटाळा प्रकरणात, त्यांच्या एफआयआरच्या संदर्भात उद्या 11 वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी बोलवलं आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘विरोधी पक्षनेत्याला माहितीचा स्रोत विचारता येत नसतो’

राज्य सरकारने केलेल्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ पहिल्यांदा स्पष्ट करतो, विरोधी पक्षनेता म्हणून जरी मला प्रीव्हिलेज आहे , माहितीचा स्रोत विचारला जाऊ शकत नाही. दुसरं म्हणजे, ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिलीय. बाहेर येऊ दिली नाही. उलट राज्य सरकारच्या मंत्र्यांनी प्रेसला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे. पोलीस जी चौकशी करतील, त्याला योग्य उत्तर देणार आहे. कारण मी गृहमंत्री राहिलो आहे. पोलिसांनी चुकीची केस केली तरीही तपासात माझं सहाय्य मागितलंय म्हणून मी निश्चितपणे देईन. अपेक्षा एवढीच आहे, माहिती बाहेर कशी आली, याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, सहा महिने सरकारकडे अहवाल पडला होता. कुणी किती पैसे दिले, कोण कुठल्या जिल्ह्यात गेलाय, अशी संवेदनशील माहिती असताना, सरकारने काही कारवाई केली नाही. सरकारवर कारवाई झाली पाहिजे की, ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असा प्रश्न आहे.

मी केलेल्या भांडाफोडला उत्तरच नाही…

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला की, विधानसभेत चार दिवसांपूर्वी त्यांची जो व्हिडिओ बॉम्ब टाकला, त्याचं राज्य सरकार आणि पोलिसांकडे काहीच उत्तर नाही. त्यामुळे त्यांनी आता या प्रकरणात मला चौकशीसाठी बोलाललं आहे. एकूणच, मुंबईतील राजकीय वातावरण आता अधिकच तापलं असून उद्या याच मालिकेती एक हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळणार.

इतर बातम्या-

धुळ्यात भरदिवसा ‘ खाकी ‘ रक्तबंबाळ, बाईकला कट मारल्याचा वाद, PSI वर चाकूहल्ला

Viral : चक्क जिभेवर आलेत काळे केस! काय आहे नेमका प्रकार? वाचा सविस्तर…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.