‘राष्ट्रवादीत 2 नेत्यांवर अन्याय झाला’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सर्वात मोठा दावा

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला आहे. "राष्ट्रवादीचा खरा चेहरा आज समोर आला आहे", अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

'राष्ट्रवादीत 2 नेत्यांवर अन्याय झाला', चंद्रशेखर बावनकुळे यांचा सर्वात मोठा दावा
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 5:49 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. पण त्यांच्या याच निर्णयावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच मागे वाय. बी. चव्हाण सेंटरला जे घडलं ते तमाशाचं वगनाट्य होतं, अशीही टीका बावनकुळे यांनी यावेळी केली. जसं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंशिवाय दुसरं कुणी चालत नाही, तसं शरद पवार यांना मुलगी सुप्रिया सुळे यांच्याशिवाय कुणी चालत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“मी अजित दादा यांच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. कारण अजित दादा हे खऱ्या अर्थाने त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी ते ठरवायचं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची निवड महाराष्ट्राकरता बरी झाली असती. मला अजित पवार यांच्या नाराजीबद्दल काही माहिती नाही. मला त्यांच्या नाराजीबद्दल काही सांगायचं नाही. पण मला एवढं माहिती आहे की, अजित दादा कार्यक्षम आहेत. छगन भुजबळ कार्यक्षम आहेत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

‘राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला’

“नागपुरात ओबीसी मेळावा झाला. देशाचा ओबीसी मेळावा नागपुरात घेतला. नागपुरात दोन दिवस भाषणं झाली. छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे बोलले की भाजप पक्ष ओबीसी विरोधी आहे. पण आज राष्ट्रवादीचा खरा चेहरा समोर आला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर अन्याय झाला”, असं बावनकुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामुळे शिवसेनेला चांगले दिवस आले. उद्धव ठाकरे यांना सत्तेमध्ये महत्त्वाची पदे मिळाली. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या भावासारखं उद्धव ठाकरेंना सांभाळलं. उद्धव ठाकरे यांची प्रत्येक गोष्ट ऐकली”, असा दावा बावनकुळे यांनी केला.

“आमच्या जिंकणाऱ्या जागाही उद्धव ठाकरे यांना दिल्या. पालघर सारखी लोकसभेची जागा दिली. 50 विधानसभेच्या जागा दिल्या. शिवसेनेला पुढे नेण्याचं काम अमित शाह यांच्या नेतृत्वात झालं. एकाच घरात मुख्यमंत्री आणि दुसरं मंत्रिपदाच्या अपेक्षेमुळे शिवसेना मागे गेली”, असं बावनकुळे म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.