बँक मॅनेजरला घरी बोलावून पाय धुतले, आमदार सुरेश धस यांची गांधीगिरी

भाजप आमदार सुरेश धस यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे (BJP MLA Suresh Dhas Gandhigiri).

बँक मॅनेजरला घरी बोलावून पाय धुतले, आमदार सुरेश धस यांची गांधीगिरी
Follow us
| Updated on: Sep 03, 2020 | 9:04 PM

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे (BJP MLA Suresh Dhas Gandhigiri). या व्हिडीओत आमदार सुरेश धस हरिणारायन आष्टा येथील एसबीआय बँकेचे मॅनेजरचे पाय धुताना दिसत आहेत. बँक मॅनेजरने पीक कर्जाच्या काही फाईल मंजूर केल्या नाहीत. त्यामुळे सुरेश धस यांनी बँक मॅनेजरला आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचे पाय धुतले. यावेळी सुरेश धस यांनी बँक मॅनेजरवर फुलांचा वर्षांव करत खांद्यावर उपरणं ठेवलं.

सुरशे धस ‘मुन्नाभाई एमबीबीएम’ या चित्रपटाचं नाव घेत आपण गांधीगिरीने बँक मॅनेजरची समजूत घालत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मॅनेजर मिळावे, असं उपरोधिक वक्तव्य धस यांनी केलं. त्याचबरोबर आष्टीतील शेतकऱ्यांनीदेखील अशीच पूजा करावी, असंदेखील ते व्हिडीओत बोलताना दिसत आहेत (BJP MLA Suresh Dhas Gandhigiri).

हेही वाचा : वर्धा-हिंगोलीत प्राणी क्वारंटाईन करण्याची वेळ, साडेतीन हजार गुरांना लम्पी त्वचारोग

दरम्यान, सुरेश धस यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बँक मॅनेजरला घरी बोलावून त्याची जबरदस्ती पूजा करणे, अंगावर फुले टाकणे, टोमणे मारणे हा खरंच गांधीगिरीचा मार्ग आहे का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. ही गांधीगिरी आहे की दादागिरी? असादेखील सवाल उपस्थित केला जात आहे.

सुरेश धस यांचे याअगोदरही अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ते नेहमी कोणत्यातरी कारणासाठी चर्चेत असतात. जनतेने त्यांना कधी ढोली बाजा तर कधी ‘मै हूँ डॉन’ या गाण्यावर थिरकताना बघितलं आहे. यावेळी बँक मॅनेजरसोबतच्या व्हिडीओमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.