AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प

भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाले लावण्याचा संकल्प केलाय. बोरिवलीमध्ये वृक्षारोपणाच्या एका कार्यक्रमात शेट्टी यांनी ही घोषणा केलीय.

पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाडं लावली जाणार, भाजप खासदार गोपाळ शेट्टींचा संकल्प
खासदार गोपाळ शेट्टी यांचा वृक्षारोपणाचा संकल्प
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 5:04 PM

मुंबई : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मुंबईतील अनेक झाडं उन्मळून पडली. अनेक झाडं धोकादायक असल्याचं सांगत तोडण्यात आली. मात्र, त्या तुलनेत नव्याने वृक्ष लागवड होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पूर्व उत्तर मुंबईत 5 हजार झाले लावण्याचा संकल्प केलाय. बोरिवलीमध्ये वृक्षारोपणाच्या एका कार्यक्रमात शेट्टी यांनी ही घोषणा केलीय. (Gopal Shetty decides to plant 5,000 trees in East Mumbai area)

चक्रीवादळामुळे मुंबईतील झाडं तोडली जात आहेत. जून महिना संपत आला तरी मुंबई महापालिकेकडे अजून झाडं नाहीत. मुंबईच्या महापौरांनी अजून कुठंही झाडं लावली नाहीत. सोबतच आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकानं महापालिकेकडे झाडं नसल्याबाबत आवाज उठवला नाही, अशी खंतही गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलीय. कोरोना संकटाच्या काळात गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या साथीनं 5 हजार बाटल्या रक्त जमा करण्याचा संकल्प केला होता आणि तो त्यांनी पूर्णही केला आहे. आता शेट्टी यांनी पूर्व मुंबईत 5 हजार झाडांची लागवड करण्याचा संकल्प केलाय.

मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा?

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात मला मंत्रिपद दिले तरी नको, मी खासदार म्हणूनच ठीक आहे, अशी भूमिका मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली आहे. केंद्रात मंत्रिपदासाठी शेट्टी तूर्तास तरी इच्छुक नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलात माझे नाव असल्याची चर्चा मी माध्यमांतून ऐकली. मात्र मला मंत्रिपद नको. मी खासदार म्हणून काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया खासदार गोपाळ शेट्टी यानी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

जुलै महिन्यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात राज्यातून गोपाळ शेट्टी आणि सुरेश प्रभू यांची नावे चर्चेत आहे. मंत्रिपदाला न्याय देऊ शकतील अशी माझ्यापेक्षा चांगली व्यक्तिमत्व भाजपात आहेत. मी खासदार राहूनच जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करु शकतो, असं मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलं.

कोण आहेत गोपाळ शेट्टी?

गोपाळ चिन्नया शेट्टी हे मुंबईतील प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. 31 जानेवारी 1954 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. नॉन मॅट्रिक असलेल्या गोपाळ शेट्टी यांनी भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी 35 वर्ष साईनाथ इंजिनीयरिंग वर्क्सच्या माध्यमातून टर्नर फिटर वेल्डरचा व्यवसाय केला. मात्र, नंतरच्या काळात जनसंपर्क आणि चांगल्या कामगिरीच्या बळावर ते भाजपमध्ये एकएक पायरी चढत वर गेले.

इतर बातम्या :

राज्य सरकारच्या बेफिकिरीमुळेच स्वप्निल लोणकरची आत्महत्या; प्रवीण दरेकरांची टीका

Video : विकेंड लॉकडाऊनची ऐशीतैशी, कव्वालीच्या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण

Gopal Shetty decides to plant 5,000 trees in East Mumbai area

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.