महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार; नाशिकचे नेतृत्व कोणाकडे?

नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरू केलीय. पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरूय. यापूर्वी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आघाडीची साद घातली. मात्र, तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहता भुजबळांनी एकला चलो चा नारा दिलाय.

महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार; नाशिकचे नेतृत्व कोणाकडे?
Nashik Municipal Corporation
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:46 AM

नाशिकः गेल्या दहा वर्षांपासून नाशिकमध्ये (Nashik) सत्तेची मधुर फळे चाखणाऱ्या भाजपने (BJP) येणारी महापालिका (Municipal Corporation) निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी सर्वच्या सर्व 133 जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत किती जण कुठून-कुठून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत हे पाहिले जाणार आहे. विशेषतः उद्यापासून राज्यातील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे धुरंधर देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आगामी महापालिका निवडणूक ध्यानात घेता पक्षाची रणनीती ठरवण्यात येणार असल्याचे समजते. या दौऱ्यात फडणवीस विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.

युतीची फक्त चर्चा

नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. यापूर्वीची पाच वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजप सत्तेत होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर महापालिकेत सत्ता स्थापन केली. यंदा भाजप आणि मनसे यांच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नाशिकसाठी मनसेनेही जोर लावलाय. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सप्टेंबरपासूनच नाशिकचे दौरे केले. त्यानंतर अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांनीही नाशिक दौरा केला. त्यानंतर फडणवीस आणि राज यांची भेट झाली. मात्र, या दोन्ही पक्षांतील युतीची शक्यता भाजप आणि नंतर मनसेकडूनही फेटाळण्यात आली. त्यामुळेच भाजपने स्वबळावर कंबर कसलीय.

नेतृत्व कोणाकडे?

राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून नाशिककडे पाहिले जाते. या महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा आता सुरू झालीय. यापूर्वी गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये लक्ष घातले होते. मात्र, त्यांचे आणि स्थानिक नेत्यांचे सूत म्हणावे तसे जुळले नाही. सध्या नाशिकचे प्रभारीपद जयकुमार रावल यांच्याकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीचे नेतृत्व कोण करणार, याची उत्सुकता आहे. कदाचित देवेंद्र फडणवीस उद्याच्या दौऱ्यात याबाबत संकेत देऊ शकतात.

शिवसेनेचे काय?

दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्वबळाची तयारी सुरू केलीय. पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरूय. यापूर्वी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आघाडीची साद घातली. मात्र, तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहता भुजबळांनी एकला चलो चा नारा दिला. सध्या महापालिकेत शिवसेना विरोधी पक्ष आहे. सेना सुद्धा ही निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यताय. इथे खरी लढत भाजप विरुद्ध शिवसेना, अशीच होण्याची शक्यताय.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.