10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास विलंब शुल्क माफी, परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा
'कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे', असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
मुंबई : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी (Students) एक महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. ‘कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मुदतीनंतर विलंब फी भरावी लागत होती. मात्र सध्याची आव्हानात्मक परिस्थिती पाहता यावर्षी मुदतीनंतर फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब फी आकारण्यात येणार नसल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत केली. तांत्रिक बाबींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याची माहिती काही मान्यवर सदस्यांनी चर्चेदरम्यान पुरवली, असं गायकवाड यांनी सांगितलं.
शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय?
आतापर्यंत इयत्ता 12 वीचे 14 लाख 31 हजार 667 आणि इयत्ता 10 वीचे 15 लाख 56 हजार 861 आवेदन पत्रं प्राप्त झाले आहेत. शाळेच्या संपर्कात नसलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क करून परीक्षा फॉर्म भरून घेण्याबाबत @msbshe मार्फत सर्व शाळा, कॉलेजना कळवण्यात येईल व जाहीर प्रसिद्धी देण्यासाठी वर्तमान पत्रांद्वारे कळवण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे. #हिवाळीअधिवेशन२०२१ pic.twitter.com/7YPc5LO23h
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 23, 2021
10वी, 12 वी परीक्षेच्या तारखा
राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 10वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे, तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आठ दिवसांपूर्वी दिली. 10वी, 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधी होणार? याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना होती, त्या तारखा गायकवाड यांनी जाहीर केल्या.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो, सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
इतर बातम्या :