सोनू सूदची बायको सोनाली गंभीर जखमी, मुंबई- नागपूर हायवेवर भीषण अपघात; कसा झाला अपघात?
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा भीषण अपघात झाला आहे.

बॉलिवूडल अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ती जखमी झाली आहे. पण अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोनालीवर सध्या नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुर आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली तिच्या बहिण आणि भाच्यासोबत गाडीतून मुंबई- नागपूर हायवेवरून प्रवास करत होती. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. या भीषण अपघातामध्ये सोनाली जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिचा भाचा देखील जखमी झाला आहे. दोघांवरही नागपूरमधील रुग्णलयात उपचार सुरु आहेत.
वाचा: ‘तो BJP जॉईन करतोय’, रितेश देशमुखचा मंत्रालयाच्या बाहेरील फोटो पाहून मुंबईकर आवाक




कशी आहे सोनालीची प्रकृती?
सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा अपघात झाल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. पण तिची प्रकृती चिंत्ताजनक नसल्याचे देखील सांगितले आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोनू सूदला अपघाताविषयी कळताच तो तातडीने नागपूर रुग्णालयात पोहोचला असल्याचे म्हटले जात आहे.
सोनू सूदने 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले
सोनू सूदने 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले. ती मूळची आंध्रप्रदेशची असून तेलुगू आहे. या जोडप्याला अयान आणि इशांत अशी दोन मुले आहेत. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. ती एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. सोनू सूद जितका चर्चेत असतो सोनाली त्याच्या अगदी विरुद्ध आहे. तिला तिचे आयुष्य खासगी ठेवायला आवडते.