Mumbai Murder : मोबाईलवर गेम खेळणं बंद कर आणि नोकरी शोध सांगितले म्हणून वहिनीची हत्या, आरोपी दिराला अटक

साहिबाचा इर्शादचा मोठा भाऊ जुबेरशी विवाह झाला होता. त्या दोघांना तीन मुले आहेत. इर्शाद काहीच कामधंदा करत नसे. सतत मोबाईलवर गेम खेळत असायचा. यावरुन वहिनी आणि दिरामध्ये सतत भांडण व्हायचे. जुबेर हा रोजंदारीवर मजुरी करायचा. त्यामुळे इर्शादने घराबाहेर पडून कामधंदा करावा आणि कुटुंबाला हातभार लावावा, अशी साहिबाची इच्छा होती.

Mumbai Murder : मोबाईलवर गेम खेळणं बंद कर आणि नोकरी शोध सांगितले म्हणून वहिनीची हत्या, आरोपी दिराला अटक
मालाडमध्ये दिराकडून वहिनीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:14 PM

मुंबई : मोबाईलवर गेम खेळणे बंद कर आणि नोकरी शोध असे सांगितले म्हणून दिरा (Brother-in-Law)ने वहिनीची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची घटना मालाडमधील मालवणी येथे घडली आहे. हत्या केल्यानंतर महिलेच्या गळ्याखाली विष टाकून ही आत्महत्या दर्शवण्याचा प्रयत्न आरोपीने केला. साहिबा (25) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर इर्शाद आलम असे हत्या करणाऱ्या आरोपी दिराचे नाव आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस (Malvani Police) ठाण्यात कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी इर्शादला मंगळवारी रात्री पोलिसांनी केले आहे.

साहिबाचा इर्शादचा मोठा भाऊ जुबेरशी विवाह झाला होता. त्या दोघांना तीन मुले आहेत. इर्शाद काहीच कामधंदा करत नसे. सतत मोबाईलवर गेम खेळत असायचा. यावरुन वहिनी आणि दिरामध्ये सतत भांडण व्हायचे. जुबेर हा रोजंदारीवर मजुरी करायचा. त्यामुळे इर्शादने घराबाहेर पडून कामधंदा करावा आणि कुटुंबाला हातभार लावावा, अशी साहिबाची इच्छा होती. यातूनचे तिचे भांडण होत असे.

हत्या करुन आत्महत्या केल्याचा बनाव

नेहमीप्रमाणे शुक्रवारीही वहिनी आणि दिराचे भांडण आले. यानंतर आलमने तिची हत्या करण्याचा कट रचला. प्लानप्रमाणे शनिवारी मयता घरात एकटी होती. ती किचनमध्ये असताना आलमने तिच्या पाठीमागे घुसून कपड्याने तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृत्यू झाल्यानंतर आलमने खिशातून उंदीर मारण्याचे औषध काढून तिच्या तोंडात आणि गळ्याखाली टाकली. त्यानंतर आरोपीने मालवणी पोलीस ठाण्यात फोन करुन आपल्या वहिनीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

हे सुद्धा वाचा

शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे उघड

मृतदेहाचा शविच्छेदन अहवाल मंगळवारी आला. या अहवालात महिलेच्या पोटात विष आढळले नाही. दरम्यान, डॉक्टरांना तिच्या मानेवर खुणा आढळून आल्याने मृत्यूचे कारण गळा दाबून झाल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी इर्शाद आलमला ताब्यात घेतले आणि त्याची पुन्हा कसून चौकशी केली. चौकशीत आलमने आपणच हत्या केल्याचे कबुल केले. त्यानंतर मालवणी पोलिसांनी इर्शाद विरोधात कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (Brother in law killed sister in law over minor dispute at Malvani in Malad)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.