धार्मिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्व असणारा बुलढाणा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. संत गजानन महाराजांचे शेगाव, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचं माहेर असलेलं सिंदखेड राजा आणि लोणार सरोवर याच जिल्ह्यात आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. लोणारमध्ये उल्का पडल्याने या सरोवराची निर्मिती झाली. जगातील अशा प्रकारचे हे एकमेव सरोवर आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,640 कि.मी. एवढे आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 2,586,258 एवढी असून जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण 82.09% टक्के आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस, ज्वारी, तीळ, सोयाबीन, सूर्यफुल आणि भुईमुग आदी पिके घेतली जातात. बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा. जळगाव जामोद आणि संग्रामपूर हे 13 तालुके या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.
पुढे वाचा