दारु पिण्यासाठी कोरोनाग्रस्त कोव्हिड सेंटरबाहेर, मद्यधुंद होऊन रस्त्यावर पडला, बुलडाण्यातील प्रकार

एक कोरोनाबाधित व्यक्ती जेवणासाठी आणि मद्यप्राशनासाठी कोरोना रुग्णालयाच्या बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Buldhana Covid Patient to drink liquor)

दारु पिण्यासाठी कोरोनाग्रस्त कोव्हिड सेंटरबाहेर, मद्यधुंद होऊन रस्त्यावर पडला, बुलडाण्यातील प्रकार
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 2:13 PM

बुलडाणा : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे बुलडाण्यात एक कोरोनाबाधित व्यक्ती जेवणासाठी आणि मद्यप्राशनासाठी कोरोना रुग्णालयाच्या बाहेर पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात एका कोव्हिड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. (Buldhana Covid Patient outside Center to drink liquor)

दारु पिण्यासाठी कोव्हिडी सेंटरबाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळ घाटापुरी येथे एक कोव्हिड सेंटर आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये एक 55 वर्षीय कोरोना रुग्ण जेवणासाठी आणि मद्यप्राशनासाठी कोविड रुग्णालयाच्या बाहेर पडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे एका हॉटेलवर त्याने दारु प्यायला. त्याच ठिकाणी त्याने जेवण केले.

निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार

यानंतर त्या रुग्णाला मद्यप्राशन जास्त झाल्याने रस्त्याच्या लगत पडला आहे. त्यावेळी काही समाजसेवकांनी त्याला उपचारासाठी खामगाव शासकीय रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे घाटपुरी येथील कोव्हिड सेंटरवर जेवण निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याची बोललं जात होतं. त्यानंतर आता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घाटपुरी येथील कोविड सेंटरमधून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क बाहेर जाऊन अनेकांच्या संपर्कात येतो. त्यावेळी कोविड सेंटरमधील सुरक्षा यंत्रणा काय करत असते? तहसीलदार याकडे दुर्लक्ष का करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिवसभरात 25 हजार 833 नवे रुग्ण

राज्यात काल दिवसभरात तब्बल 25 हजार 833 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत आहे. दिवसभरात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत. (Buldhana Covid Patient outside Center to drink liquor)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती काय?

सोलापुरात लग्नाचं काम अवघड होणार, नियम मोडल्यावर कार्यालयासकट वऱ्हाडींवरही गुन्हा दाखल होणार

Mumbai Corona | मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.