उघड्यावर शौचासाठी बसलेल्या 10 वर्षांच्या चिमकुल्याचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके!

Buldana Dog Attack : बुलढाणा शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट जनावरे, गाढवं, घोडे शहरातील रस्त्यांवर मुक्त संचार करताना दिसत आहेत. त्यात कुत्र्यांची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भर पडलीय.

उघड्यावर शौचासाठी बसलेल्या 10 वर्षांच्या चिमकुल्याचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके!
रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालताय, तर मग ही जबाबदारी तुमचीचImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 12:32 PM

बुलढाणा : उघड्यावर शौचासाठी बसलेल्या 10 वर्षांच्या चिमुकल्यावर रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांनी हल्ला (Buldana Dog Attack) केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुलडाणा शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये (Indira Nagar, Buldana) ही घटना घडली. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 10 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव इर्शाद शेख (Irshad Shaikh) असं आहे. तो आपल्या दोन मित्रांसह शुक्रवारी शौच करण्यासाठी घराबाहेर पडला होता. आपल्या दोन मित्रांसह उघड्यावर शौचासाठी बसलेल्या या मुलावर कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला चढवला आणि चिमुकल्या इर्शादच्या शरीराचे लचकेच तोडले. या हल्ल्यामध्ये इर्शाद गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर आता कुत्र्यांच्या हल्लामुळे परिसरात घबराट पसरली आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी?

बुलढाणा शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून मोकाट जनावरे, गाढवं, घोडे शहरातील रस्त्यांवर मुक्त संचार करताना दिसत आहेत. त्यात कुत्र्यांची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भर पडलीय. यातूनच 10 वर्षांचा चिमुकला इर्शाद शेख मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचा शिकार झालाय. त्यामुळे मोकाट जनावरांच्या प्रश्न पालिका केव्हा मार्गी लावतं, याकडे बुलढाण्यातील लोकांचं लक्ष लागलंय. अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांबाबत तक्रारी करुनही पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जातोय.

हे सुद्धा वाचा

मृत्यूशी झुंज

सध्या इर्शाद शेखवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या सर्व मोकाट जनावरांवर नगरपालिका प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करत असून, त्यांच्याच हलगर्जीपणाचा फटका आता चिमुकल्यांना देखील बसत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नगरपालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे. नगरपालिकेने किमान मोकाट कुत्र्यांचा तरी बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरु लागलीय. त्यावरआता पालिका नेमका काय तोडगा काढतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.