Buldana Doctor | बुलडाण्यात 2 बोगस डॉक्टर ताब्यात; आरोग्य विभागासह पोलिसांची संयुक्तिक कारवाई

बुलडाणा पोलिसात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आयुष अधिकारी यांनी तक्रार दिली आहे. हे डॉक्टर अगदी साध्या आजारापासून ते लैंगिक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलंय. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी ही माहिती दिलीय.

Buldana Doctor | बुलडाण्यात 2 बोगस डॉक्टर ताब्यात; आरोग्य विभागासह पोलिसांची संयुक्तिक कारवाई
बुलडाण्यात 2 बोगस डॉक्टर ताब्यातImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 12:16 PM

बुलडाणा : शहरात प्रॅक्टिस करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना आरोग्य विभागासह (Health Department) पोलिसांनी छापा मारत ताब्यात घेतले आहे. हे डॉक्टर बुलडाणा शहरातील मोठ्या देवी मंदिर परिसरात (Devi Mandir Premises) दवाखाना चालवत होते. कपिल कुमार आणि विनोद शर्मा अशी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. बुलडाणा जिल्ह्यात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अणे हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. मात्र प्रशासन यावर कारवाई करताना दिसत नाही. बुलडाणा शहरातील देवी परिसरात पकडलेले हे दोन्ही बोगस डॉक्टर हरियाणा (Haryana) राज्यातील कर्नाल येथील आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पकडण्यात आलेल्या या डॉक्टरांकडे पदवी प्रमाणपत्र आणि मेडिकल असोसिएशनचे प्रमाणपत्र देखील नाही.

आरोग्य तालुका अधिकाऱ्यांची तक्रार

याबाबत बुलडाणा पोलिसात तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आयुष अधिकारी यांनी तक्रार दिली आहे. हे डॉक्टर अगदी साध्या आजारापासून ते लैंगिक समस्या निवारण करत असल्याचं समोर आलंय. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी ही माहिती दिलीय. ग्रामीण भागात असे बोगस डॉक्टर आपली दुकानदारी थाटतात. बहुधा असे बोगस डॉक्टर आधी एखाद्या डॉक्टरकडं काम करतात. डॉक्टरकडून थोडीफार माहिती घेतात. ती झाली की, आपली स्वत:ची दुकानदारी थाटतात. अर्धवट माहितीच्या आधारे रुग्णांवर उपचार करतात. त्यामुळं हा एकप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळच असतो.

दोन्ही बोगस डॉक्टर हरियाणाचे

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही डॉक्टर हरियाणाचे आहेत. तिकडं यांनी कुठतरी एखाद्या डॉक्टरकडं काम केलं असावं. थोडीफार वैद्यकीय क्षेत्रातल्या मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आपली दुकानं थाटली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या डॉक्टरांच्या गेल्या काही दिवसांपासून तक्रारी होत्या. त्यांच्यावर आरोग्य विभागाची पाळत होती. कागदपत्र तपासले असता त्यांच्याकडं काहीच सापडले नाही. त्यामुळं ही कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.