मोदी सरकारविरोधात अनोखं आंदोलन; ‘बिरबल की खिचडी’ नेमक्या कोणत्या पक्षानं केलं लाक्षणिक उपोषण
वंचित बहुजन आघाडीने भाजपवर आणि केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या कोणत्याही अश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही.
बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे केंद्रात सत्ता आली.त्याआधी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी बेकारी, रोजगार, महागाई, भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन अनेक अश्वासनं लोकांना दिली होती. त्यानंतर मोदी सरकार येऊन नऊ वर्षे झाली तरी त्यांनी दिलेले एकही अश्वासन मोदी सरकारकडून पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे विरोधकांनी आता सातत्याने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार अपयशी ठरल्यामुळेच आता वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन छेडत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. वंचित बहुजन आघाडीने अनोखे आंदोलन छेडत भाजपवर सडकून टीका केली आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशात दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र सरकारला 9 वर्षापेक्षा जास्त वेळ होऊनही अजून रोजगाराचा प्रश्न कायम राहिला आहे.
त्यामुळे ज्या पद्धतीने ‘बिरबलची खिचडी, कधी शिजत नाही ती कोणाच्या ताटातही जात नाही’ तसे मोदी सरकार असल्याची टीका करत वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.
यावेळी वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर हे बेकार पडले असून त्यांना इतर व्यवसाय करावे लागत असल्याचे प्रतिकात्मक देखावेदेखील साकारण्यात आले होते.
वंचित बहुजन आघाडीने भाजपवर आणि केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या कोणत्याही अश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही.
त्यामुळे वंचितने केंद्र सरकार म्हणजे बिरबलच्या खिचडीसारखे असल्याची टीका करत ती खिचडी ज्या प्रमाणे कधी शिजत नाही आणि कुणाच्याही ताटात जात नाही त्या प्रमाणे भाजप लोकांबरोबर चालत आहे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.