Buldana Suicide : दोघा चिमुकल्यांसह तलावात उडी घेत आईने जीव दिला! बुलडाण्यात महिलेच्या आत्महत्येनं खळबळ

Buldana Crime News : 30 वर्षीय सरीताचा पती तिच्यावर संशय घेत. चारित्र्याच्या संशयातून तिला मारहाणही करण्यात आली होती.

Buldana Suicide : दोघा चिमुकल्यांसह तलावात उडी घेत आईने जीव दिला! बुलडाण्यात महिलेच्या आत्महत्येनं खळबळ
धक्कादायक..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 8:22 AM

बुलडाणा : एका 30 वर्षांच्या महिलेने आत्महत्या (Buldana News) केल्यानं खळबळ उडाली आहे. महिलेनं स्वतः तर जीव दिलाच, पण सोबत आपल्या दोन मुलांनाही तिनं घेतलं आणि तलावात उडी टाकली. महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या खळबळजनक घटनेनं संपूर्ण बुलडाणा हादरुन गेलंय. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या केलेल्या 30 वर्षांच्या विवाहीत महिलेचा मृतदेह (Dead Body) हाती लागला आहे. मात्र तिच्यासोबतच्या दोन चिमुकल्यांचा अजूनही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. सध्या चिमुरड्यांचा शोध सुरु आहे. या महिलेच्या कुटुंबीयांना महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आरोप केला आहे. त्यानंतर बुलडाणा पोलिसांकडून (Buldana Suicide) आता पुढील कारवाई केली जातेय. पतीच्या संशयी वृत्तीमुळे आणि मारहाणीमुळे महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान, या महिलेनं 11 वर्षीय मुलगी आणि नऊ वर्षांच्या मुलांनी तलावात ढकललं आणि स्वतःही तलावात उडी घेत आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.

नेमकं काय प्रकरण?

बुलडाणा तालुक्यातील करडी येथील तलावात 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर याबाबतची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात या महिलेच्या मृतदेहाची ओळखही पटवण्यात आली.

Buldana Suicide

सरीता पैठणे आणि तिची दोन मुलं..

सरिता पैठणे असं मृत महिलेचं नाव असून तिने आत्महत्या केल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे तलावात उडी घेताना तिनं आपल्या पोटच्या पोरांनाही मृत्यूच्या दारात धडकललंय. 11 वर्षीची वेदीका आणि 1 वर्षांचा वंश या दोघा चिमुरड्यांसह सरिताने तलावात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, सरिताचा मृतदेह हाती लागलाय. पण तिच्या दोघा मुलांचा शोध सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

मृत महिलेच्या पतीवर गंभीर आरोप

30 वर्षीय सरीताचा पती तिच्यावर संशय घेत. चारित्र्याच्या संशयातून तिला मारहाणही करण्यात आली होती.या जाचातून कायमची सुटका मिळावी, म्हणून तिनं पोटच्या पोरांसह आत्महत्या केली, असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत सरीताच्या नातलगांची गंभीर आरोप केले आहेत.

सरीताच्या भावाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस आता याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. आईने आपल्या दोघा चिमुरड्यांसह आत्महत्या केल्यानं परिसरा खळबळ माजली आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.