झेडपीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांसाठी आंदोलन, पालकांविरोधात गुन्हे; गावकऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय

प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेता पालकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

झेडपीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांसाठी आंदोलन, पालकांविरोधात गुन्हे; गावकऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 8:56 PM

बुलढाणा : माटरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 18 वर्गखोल्या आहेत. शाळेत वर्ग पाच ते दहा आहेत. फक्त सहा शिक्षक काम करतात. शाळेला मोठं पटांगण असलं, तरी शाळेला संरक्षक भिंत नाही. त्यामुळं जनावर शाळेत येतात आणि घाण करतात. दहा ते बारा खेडेगावातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स बेंच हवेत. मात्र, या शाळेतील बहुतेक डेक्स बेंच हे मोडलेले आहेत. मोजकेच डेक्स बेंच उरले आहेत. शाळेत शौचालय नाही. प्रयोगशाळा नाही. गणित आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयाला येथे शिक्षक नाहीत. त्यामुळे पालक जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करतात. पालक शिक्षक द्या, अशी मागणी करत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन त्यांची मागणी मान्य करत नाही. २ ऑगस्ट रोजी पालकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेसमोर जाऊन आंदोलन केले. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेता पालकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अन्यथा सोमवारपासून शाळा बंद

माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये गेल्या दोन वर्षापासून ८ शिक्षकांची पदं रिक्त आहेत. रिक्त पदावर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थी जिल्हा परिषदेसमोर २ ऑगस्ट रोजी गेले होते. या पालक आणि शाळा समितीच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर गुन्हे दाखल केले. त्याचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांचे वतीने आज माटरगाव बंदचे आवाहन करण्यात आले. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे. अन्यथा सोमवारपासून शाळा बंद ची भूमिका माटरगाव येथील ग्रामस्थांनी घेलली आहे.

माटरगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. पाच ते दहापर्यंत वर्ग आहेत. परिसरातील बारा गावातील मुले याच शाळेत शिक्षणासाठी येतात. मात्र एवढ्या मोठ्या शाळेवर फक्त सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. दहा शिक्षक कमी आहेत. यापैकी गणित आणि विज्ञान विषयाला शिक्षक नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ज्या खोल्या आहेत त्यापैकी अनेक खोल्या पावसाळ्यात गळतात.

गावकरी-प्रशासनातील संघर्ष वाढला

शाळेला संरक्षण भिंत नसल्याने मुलींच्या सुरक्षाचे प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात पालक शिक्षकांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदसमोर विद्यार्थी घेऊन आंदोलनासाठी गेले होते. मात्र प्रशासनाने पालकांवरचं शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गंभीर गुन्हे दाखल केले. याचा संताप ग्रामस्थांमध्ये आहे. तत्काळ हे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी आज गाव बंद करण्यात आले. येत्या सोमवारपासून शाळा बंद आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. त्यामुळे आता ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद प्रशासन संघर्ष पाहायला मिळणार आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.