Buldhana Video : कपाळावर बाशिंग, नवरदेव काढतोय म्हशीचं दूध, बुलडाण्यातल्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा
बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील नवरदेवाला चक्क नानमुखाच्या दिवशी वऱ्हाडींना सोडून म्हशीचे दूध काढावे लागले. बुलडाणा मोताळा तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांचा पशुपालन हा जोडधंदा असून हा परिसर खव्यासाठी प्रसिद्ध आहे.
बुलडाणा : अलिकडच्या काळात आपण लग्नातले अनेक भन्नाट व्हिडिओ आणि फोटोज पाहतो. वेगवेगळ्या स्टाईले, हटके पद्धतीने होणारी प्रपोज आणि लग्नही पाहतो. मात्र शेतकऱ्यांच्या आणि दुध उत्पादकांच्या मुलाचे लग्न कशी होतीत. त्याचं चित्र स्पष्ट करणाहा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चक्क नवरदेवच बाशिंग बांधलेलं असताना म्हशींचं दूध काढताना दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाना जिल्ह्यातील हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये हळद लागलेला नवरदेव कपाळावर बाशिंग बांधून म्हशीचे दूध काढत आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील नवरदेवाला चक्क नानमुखाच्या दिवशी वऱ्हाडींना सोडून म्हशीचे दूध काढावे लागले. बुलडाणा मोताळा तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांचा पशुपालन हा जोडधंदा असून हा परिसर खव्यासाठी प्रसिद्ध आहे.
नवरदेवाचा दूध काढतानाचा व्हिडिओ
बुलडाण्यातल्या नवरदेवाचा दूध काढतानाचा व्हिडिओ व्हायरल… pic.twitter.com/fgIsynVcTw
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi Live (@tv9_live) May 29, 2022
म्हैस फक्त एकालाच दूध काढू देते
शेतकरी म्हटल की तो आपल्या जनावरांना जीव लावतोच. त्यातूनच कधी कधी शेतकऱ्यांची अनेकदा अडचण होते. गाय किंवा म्हैस ही शेतकऱ्यांच्या घरातील ठराविक लोकांनाच दूध काढू देते, त्यामुळे लग्न कार्यात बऱ्याचदा शेतकऱ्यांची अडचण होते. असाच प्रकार मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथे घडलाय. प्रतीक बोराळे याचा 27 मे रोजी विवाह होता, 26 मे रोजी नानमुखाचा कार्यक्रम असताना म्हैस मात्र त्याला एकट्यालाच दूध काढू देत असल्याने त्याला वऱ्हाडी सोडून गोठ्यात म्हशीचे दूध काढण्यास जावे लागले. आपले कर्तव्य तसेच व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या प्रतीकनेही तितक्याच निष्ठेने म्हशीचे दूध काढले, 27 मे रोजी त्याचे लग्न लागले, आणि पुन्हा घरी आल्यावर त्यालाच दूध काढावे लागले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल चांगलाच होत आहे.
व्हिडिओत नेमकं काय?
कपाळावर लग्नाचं बाशिंग, अंगात पिवळा कुर्ता आणि पायात कोल्हापूरी चप्पल, समोर म्हैस आणि बादली, अशा परिस्थित हा नवरदेव या म्हशीचं दूध काढताना दिसून येत आहे. शेतकरी हा आपल्या जनावरांना जीवापाड जपत असतो. काही जनावरांना एकाच माणसाच्या हातून दूध देण्याची सवय असते. त्यामुळे ही म्हैससुद्धा एकाच माणसाला दूध देते आणि तोच नवरदेव असल्याने म्हशीचं दूध तर चुकवू शकत नाही. त्यामुळे नवरदेवालाच आहे तशा परिस्थितीत दूध काढायला बसावलं लागलंय. हीच परिस्थिती ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांची आहे. असे अनेक भन्नाट प्रकार ग्रामीण भागात घडत असतात.