बुलडाण्यात सुसाट स्कूल बसची कामगाराला धडक, बसच्या मागच्या चाकाखाली येऊन डोकचं फुटलं
बुलडाणा येथील सहकारच्या विद्या मंदिराच्या स्कूल बसच्या (Sahakar Vidya Mandir School) धडकेत मजूर जागीच ठार झाला. 35 वर्षीय मोहन अवसरमोल असं मृतकाचं नाव आहे. बुलडाणा शहरातील वानखडे ले आउटमध्ये ही घटना घडली.
बुलडाणा : येथील सहकार विद्या मंदिर स्कूलची (Sahakar Vidya Mandir School) 13 व्या क्रमांकाची बस विद्यार्थ्यांना शाळेतून घरी घेऊन जात होती. बसचा वेग खूप जोराचा असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. बुलडाणा शहरातील वानखेडे लेआउटमध्ये (Wankhede Layout in Buldana City) एक व्यक्ती स्कूल बसच्या मागील चाकाखाली आला. संबंधित कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मोहन जगन्नाथ अवसरमोल असे मृतकाचे नाव आहे. तो बुलडाणा तालुक्यातील केसापूर येथील रहिवासी आहे. मोहन अवसरमोल हा रस्त्याने जात होता. तेवढ्यात रेणुका टायपिंग परिसरामध्ये (Renuka Typing Complex) विद्यार्थी सोडून स्कूल बस परत आली. ही घटना काल दुपारी घडली.
डोक्यावरून गेली बस
सहकार विद्या मंदिरची ही स्कूल बस होती. स्कूल बसच्या मागील चाक या इसमाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी स्कूल बस चालकाने काही अंतरावर स्कूल बस उभी केली. त्यानंतर तिथून पळ काढला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केलीय होती. प्रत्यक्षदर्शीनुसार बसवरील चालक हा सुसाट गाडी पळवत होता. त्यामुळे ही घटना घडली असावी.
बालक धास्तावले
काही चालक सुसाट गाडी चालवितात. त्यामुळं अशा घटना घडतात. अशा चालकांवर आवर घालणं आवश्यक आहे. योग्य वेळेवर पोहचायचं नाही. मग, उशीर झाला म्हणून सुसाट गाडी चालवायची. यामुळं असे अपघात घडतात. चालकांनी वेळेचं भान ठेवून गाडी चालविली पाहिजे. आता या घटनेत विनाकारण कामगाराचा मृत्यू झाला. अपघात पाहणाऱ्या बालकांच्या मनात धडकी भरली. त्यामुळं तेसुद्धा चांगलेच धास्तावले आहेत. पोलिसांनी बस ठाण्यात जमा केली. पोलीस तपास सुरू आहे. चालप पसार झालाय.