“कुठे गेला 56 इंच सीना”, सीमावादावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले लक्ष्य

काँग्रेसच्या नाना पटोले यांनी खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आल्याने या देशात हुकूमशाही सुरू आहे.

कुठे गेला 56 इंच सीना, सीमावादावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले लक्ष्य
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 6:43 PM

बुलढाणाः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर सीमाप्रश्नावरून नवावाद निर्माण झाला होता. त्यानंतर कर्नाटकातील बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्रातील नेत्यांवर बेळगावमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली. त्यावरून राज्यातील विरोधकांनी केंद्रात, आणि कर्नाटकात भाजप सत्तेत असूनही जर लोकप्रतिनिधींना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास बंदी घालत असेल तर हे चूक असल्याचे सांगत केंद्रावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

आजही खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आल्याने काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला.

शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आता कुठे गेला 56 इंचीचा सीना असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टोला हाणला आहे.

मागील काही दिवसांपासून बेळगाव सीमावाद प्रचंड तापला आहे. त्यामुळे सातत्याने त्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून आणि इतर नेत्यांकडून बेताल वक्तव्य केली जात होती.

त्यावरून केंद्र सरकारनेही हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती.

त्यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही सामोपचाराने हा वाद सोडवण्याचे संकेत देण्यात आले होते मात्र त्यानंतरही कर्नाटक सरकारकडून बेताल वक्तव्य केली जात असून महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक प्रवेश बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसने केंद्र सरकारसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

काँग्रेसच्या नाना पटोले यांनी खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आल्याने या देशात हुकूमशाही सुरू आहे.

महाराषट्राचा खासदार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकत नसेल तर केंद्र सरकार झोपी गेलं आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगण्यात येणारा 56 इंच सीन आता यावेळी कुठे गेला असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.