मद्यधुंद कार चालकाच्या रस्त्यावर धुमाकूळ, नागरिकांनी पाठलाग केल्यानंतर…
दारुच्या नशेत गाडी चालवण्यास अपघातही होतात. पण, मद्यपींना याची काही पर्वा राहत नाही. ते नशेत असताना त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढतो. असाच एक मद्यपी बेधुंद अवस्थेत गाडी चालवत होता.
गणेश सोळंखी, प्रतिनिधी, बुलढाणा : दारुच्या नशेत कोण काय करेल काही सांगता येत नाही. दारुच्या नशेत खून झाल्याच्या घटना आपण पाहतो. दारुच्या नशेत गाडी चालवण्यास अपघातही होतात. पण, मद्यपींना याची काही पर्वा राहत नाही. ते नशेत असताना त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढतो. असाच एक मद्यपी बेधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. नागरिकांना त्याचा पाठलाग केला.तत्पूर्वी त्याने गाडी ठोकली. पण, थोडक्यात बचावला. पोलिसांना बोलावण्यात आले. तरीही त्याची नशा उतरली नव्हती. गाडीवर चढून त्याने धिंगाणा घातला.
गाडीला नंबरही नाही
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दारूच्या नशेत चालक गाडी चालवत होता. विशेष म्हणजे या गाडीला नंबर नव्हता. नंबर नसलेली कार रस्त्यावर भरधाव वेगाने सुरू होती. गाडी आडवीतीडवी चालवल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी एका कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय.
नशेत चालवली गाडी
मद्यपी ड्रायव्हरचे नाव बाबासाहेब सोलट असे आहे. तो बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी आहे. मद्यपी बाबासाहेब सोलाट याने मारुती ब्रेझा कार, ही जालना-देऊळगाव राजा रोडवर भरधाव वेगाने आडवीतीडवी चालवली.
नागरिकांनी केला पाठलाग
यावेळी त्याची कार बस स्थानकाजवळ दुभाजकला धडकून अपघातही झाला. चालक पुन्हा कार शहरातून भरधाव वेगाने चालवत जात असताना अपघात होता होता राहिला. मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
गाडीवर बसून गोंधळ
मद्यपी चालकाने गाडीवर बसून गोंधळ घातला असल्याचे पाहायला मिळाले. गाडीच्या चारहीबाजूला लोकं जमा झाले. मद्यपी लोकांना नमस्कार करताना दिसतो. धुंदीत नसल्यावर काय-काय होऊ शकते, हे यानिमित्ताने पाहायला मिळाले.
या सर्व प्रकारामुळे नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले. मद्यपीचे हसे झाले. पण, त्याच्या चेहऱ्यावर याचा काहीच परिणाम झालेला दिसला नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला याचे काही वाटले नाही. लोकांनी गर्दी केल्याने त्या मद्यपीची चांगलीच चर्चा रंगली आहे.